पोलिसांनी भाजी बाजार पाडला बंद...विक्रेत्यांची छगन भुजबळांकडे दाद

रविवारी सकाळी नाशिकचा भाजीबाजार सुरु झाला. मात्र शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेला हा बाजार दुपारी पोलिसांनी लगेचच बंद केला. यावेळी विक्रेत्यांना अक्षरशः पळवून लावले. त्यामुळे संतप्त विक्रेते आता पालकमंत्री छगन भुजबळांकडे दादमागणार आहेत.
Nashik Police Forced to Close Vegetable Market
Nashik Police Forced to Close Vegetable Market

नाशिक रोड  : कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सरु झाल्यापासून शहरातील उड्डानपुलाखाली भरणारा भाजीबाजार बंद आहे. यापुर्वी दोनदा हा बाजार सुरु करण्याचा प्रयत्न पोलिसांनी अयशस्वी केला. रविवारी सकाळी पुन्हा हा बाजार सुरु झाला. मात्र शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेला हा बाजार दुपारी पोलिसांनी लगेचच बंद केला. यावेळी विक्रेत्यांना अक्षरशः पळवून लावले. त्यामुळे संतप्त विक्रेते आता पालकमंत्री छगन भुजबळांकडे दाद मागणार आहेत. 

उड्डाणपुलाखाली भरणारा भाजी बाजार लॉकडाउनचे कारण देत पोलिस व जिल्हा प्रशासनाने दोन महिन्यांपासून बंद ठेवला होता. आता चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये सर्व बाजारपेठा हळूहळू सुरळीत होत असताना रविवारी सकाळी भरलेला भाजी बाजार प्रशासनाने दुपारीच उठवला. प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करून विशेषतः सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून भरविण्यात आलेला बाजार उठविल्याने ग्राहक व विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करीत विक्रेत्यांना अक्षरशः पळवून लावले. 

प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप

यासंदर्भात प्रशासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप भाजी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. रविवारी सकाळी भाजी बाजार सुरू होताच दुपारी महापालिकेने पोलिसांच्या मदतीने तो बंद पाडला. बाजार बंद पाडल्यावर आपल्यावरील अन्यायाची दाद पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांच्याकडे मागणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

आंदोलन करण्याचाही इशारा

यावेळी तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. दोन महिन्यांपासून भाजी विक्रेते विनाव्यवसाय आपला उदरनिर्वाह करीत आहेत. साडेचारशे भाजी विक्रेत्यांवर तब्बल दोन हजार माणसे अवलंबून आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीच हा भाजी बाजार बंद ठेवला होता.  तो लवकरच जेल रोडच्या के. एन. केला शाळेमागील मैदानात स्थलांतरित केला जाईल, असा दावा महापालिकेचे विभागीय अधिकारी महेंद्र पगारे यांनी केला. 

पोलिस विरुद्ध विक्रेते वाद रंगला

लॉकडाउनमुळे दोन महिने येथील विक्रेत्यांनी उपासमारी सहन करत बाजार बंद ठेवला. मात्र, मद्यविक्रीसह सर्वच व्यवसाय सुरू झाले असताना भाजी बाजारावर निर्बंध घातले जात आहेत. भाजी विक्रेते महिनाभरापासून पोलिस व महापालिकेचे उंबरठे झिजवत परवानगी मागत असतानाही त्यांची टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्क, हातमोजे असे सर्व नियोजन करून रविवारी विक्रेत्यांनी भाजी बाजार सुरू केला. मात्र, महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पोलिसांनी तो उठवून दिला. त्यामुळे गेले काही दिवस पोलिस विरुद्ध विक्रेते असा वाद रंगलेला आहे. त्याला नवे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. या विषयावर राजकीय नेते, आमदार, नगरसेवक मात्र हातचे राखून प्रत्यक्ष भाग घेण्यापासून लांबच रहात आहेत. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com