वडिलांवरील ट्रोलिंगवर रोहिणी खडसे रणांगणात - Rohini Khadse criticizes BJP MLA Ram Satpute | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

वडिलांवरील ट्रोलिंगवर रोहिणी खडसे रणांगणात

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

भोसरी प्रकरणात दोषी होते तर चौकशी समितीचा अहवाल विधिमंडळात का मांडला नाही?

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेससचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देतांना भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांनी खडसे यांच्यावर भ्रष्टचार केल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिनी खडसे यांनी सातपुते यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांच्या ट्रोलिंगवर रोहिणी खडसे रणांगणात उतरल्या आहेत.

रोहिणे खडसे यांनी या संदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या की ''मंत्रिपद काढले.. जर भोसरी प्रकरणात दोषी होते तर चौकशी समितीचा अहवाल विधिमंडळात का मांडला नाही? दूध का दूध पानी का पानी केले असते'' असे रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत. 

एकनाथ खडसे काय म्हणाले होते? 

''देवेंद्र फडणवीसांना सत्ता कधी येईल यासाठी मला वाटते रात्री बेरात्री पण त्यांना स्वप्न पडत असेल. सध्या सरकार पडणार असे ते सांगत आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या तारखांचे भाकीत करत आहेत. ते ब्राम्हण असल्याने त्यांचे भाकीत खरे ठरेल असे मला वाटत होते. मात्र, त्यांचे कोणतेही भाकीत खरे ठरलेले नाही'', असे म्हणाले होते. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजित रक्तादान शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली होती.

हे ही वाचा : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत 'करेक्ट कार्यक्रम' कुणाचा?

भाजपमध्ये सध्या अनेक आमदार नाराज आहेत. त्यांची नाराजी कमी करण्यासाठी पुन्हा आपले सरकार येणार असल्याचा आशावाद फडणवीस त्यांच्या आमदारांना देत आहेत. मात्र, हे सरकार पडणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. मात्र, त्यांना याच ज्ञान नाही असे ही खडसे म्हणाले होते.  

राम सातपुते काय म्हणाले होते. 

एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर राम सातपुते यांनी खडसे यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की ''नाथाभाऊ आपण आयुष्यभर पैसे खायचे सोडून दुसरे काहीच केले नाही आणि देवेंद्र भाऊ बद्दल बोलत आहात. विरोधी पक्षनेता असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेंद्रजीवर बोलण्या अगोदर आरसा बघा सगळे लक्षात येईल'' असे सातपुते म्हणाले होते. 

हे ही वाचा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार!
 

दुसर्या ट्वीटमध्ये सातपुते म्हणाले होते की ''भोसरी जमीन घोटाळा. ताई मंत्रीपद गेले ना हो नाथाभाऊंच या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तीच कारवाई झाली ना तेव्हा. आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगर च्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई..?  बात निकली ही है तो दूर तक जायेगी'' ..! असा इशाराही सातपुते यांनी खडसे यांना दिला होता. 

 
रोहिणी खडसे काय म्हणाल्या होत्या? 

 

राम सातपुते यांच्या आरोपा नंतर रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत त्यांना उत्तर दिले होते. त्या म्हणाल्या होत्या की ''अहो जर पैसे खात होते तर मग सत्ता होती तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा काय तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणी असेल तुमच्यात हिंमत तर सिद्ध करा ना? शामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांचे बद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का? अशी घणाघाती टिका त्यांनी केली होती.  

Edited By - Amol Jaybhaye 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख