राजू शेट्टींचे नाव आमदारांच्या यादीतून वगळले का...? जयंत पाटलांनी दिले हे उत्तर

विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांवर लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी, यासाठी आम्ही राज्यपाल कोशियारी यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Raju Shetty's name removed from list of MLAs? Jayant Patil gave this answer
Raju Shetty's name removed from list of MLAs? Jayant Patil gave this answer

जळगाव : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या यादीत कोणाचेही नाव वगळले नाही. आम्ही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथे बोलताना दिली.(Raju Shetty's name removed from list of MLAs? Jayant Patil gave this answer)

चाळीसगाव येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आज (ता. ४ सप्टेंबर) पहाटे जलसंपदा मंत्री पाटील दाखल झाले आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील ग्वाही दिली. 

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादीच्या कोट्यातून शिफारस करण्यात आलेले स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार  राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. शेट्टी यांच्या जागी राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांचे नाव सूचविल्याचे पुढे आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील बोलत हेाते.


हेही वाचा : एकनाथ खडसे अडचणीत? ईडीने दाखल केले एक हजार पानी आरोपपत्र

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना देण्यात आलेल्या आमदार नियुक्तीच्या यादीतून कोणचेही नाव वगळलेले नाही. विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांवर लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी, यासाठी आम्ही राज्यपाल कोशियारी यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील ईडी कारवाईबाबत बोलताना पाटील म्हणाले की, आम्ही एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. ईडीची कारवाई कोणतीही चूक नसताना केवळ विरोधकांना नामोहरम करण्यासाठी म्हणून केली जात आहे. यातूनच एकनाथ खडसे यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादीशी सन्मानपूर्वक आघाडी; अन्यथा २० जागांचे काँग्रेसचे लक्ष्य
 
विधान परिषदेच्या १२ आमदारांची यादी जाहीर करण्यास राज्यपाल कोशियारी यांच्याकडून होत असलेल्या विलंबाबत पाटील म्हणाले, राज्यपाल कोशियारी हे लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवीत आहेत, असे आता लोकांना वाटायला लागले आहे. कारण, विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नावाची यादी देवून बराच काळ झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com