जळगाव जिल्ह्यात गुलाबराव - चिमणरावांचे जमेना!     - Problems in Jalgaon District Shivsena Between Gulabrao Patil and Chimanrao Patil | Politics Marathi News - Sarkarnama

जळगाव जिल्ह्यात गुलाबराव - चिमणरावांचे जमेना!    

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

काही काळापासून पालकमंत्री गुलाबराव पाटील व चिमणराव पाटील यांच्यात सुप्त वाद सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार आहेत तर मुक्ताईनगरचे  अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील  शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. शिवसेनेचे गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू आहे

 जळगाव : शिवसेनेतर्फे जळगावात काल रुग्णवाहिका अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षातर्फे लावलेल्या पोस्टरवर जिल्ह्यातील मंत्र्यांसह सर्व आमदारांचे फोटो होते. मात्र पारोळ्याचे शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांचा फोटो नसल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

काही काळापासून पालकमंत्री गुलाबराव पाटील व चिमणराव पाटील यांच्यात सुप्त वाद सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार आहेत तर मुक्ताईनगरचे  अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील  शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले आहेत. शिवसेनेचे गुलाबराव पाटील पालकमंत्री आहेत. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. गेल्या महिन्यात पारोळा एरंडोल दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री पाटील यांनी आपल्या पक्षाचे आमदार चिमणराव पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. 

काल पक्षातर्फे तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्याचे मंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथराव शिंदे यांनी जिल्ल्यासाठी एक आय सी यु रुग्णवाहिका दिली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा होता. मात्र, मात्र पक्षातर्फे लावण्यात आलेल्या पोस्टवर आमदार चिमणराव पाटील यांचा फोटो नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त झाले. यावर अंतर्गत चर्चाही सुरू झाली. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत वाद असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. आता आमदार चिमणराव पाटील यावर काय भूमिका घेतात याकडे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख