फडणवीस यांची सोशल मिडियात बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा : नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ - police FIR against four people for defaming Fadnavis on social media | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस यांची सोशल मिडियात बदनामी करणाऱ्यांवर गुन्हा : नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 1 मे 2021

अर्वाच्या शब्द यात वापरले होते....

नाशिक : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी (ता. 30 एप्रिल) रोजी झालेला दौरा वेगळ्याचा कारणांनी गाजला. त्यांनी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयातील  कोरोना सेंटरची पाहणी करताना कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसोबत सवांद साधला. त्याच वेळ त्यांच्याबद्दल अपशब्द वापरून ती क्लिप सोशल मिडियात व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. 

फडणवीस हे राज्यभर दौरे करून कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. त्यानिमित्ताने भाजप नेत्यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरची उदघाटने करत आहेत. भाजपची सत्ता असलेल्या पालिकांमध्ये पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने मार्गदर्शन करत आहेत. ते काल नाशिकमध्ये असताना काहींनी जाणीवपूर्वक व्हिडीओ क्लिप करून त्यांची बदनामी केल्याची तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी खातरजमा करीत पाच संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड  खळबळ उडाली आहे.

रतन खालकर , संकेत भोसले, प्रमोद कोहकंडे, राहुल जोशी, बंटी ठाकरे अशी संशयितांची  नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ५००, ५०१, ५०४ आणि ५०६  प्रमाणे नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. याप्रकरणी नाशिकरोड भाजप मंडळाचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी पोलिस  ठाण्यात तक्रार दिली. 

अर्वाच्य, बदनामीकारक आणि शिवराळ भाषेत फडणवीस यांची व्हिडीओ क्लिप फेसबुकवर व्हायरल केली. तसेच यामध्ये मारहाण करण्याची धमकी देखील देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अनेक राजकीय नेत्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. त्यातून शिवराळ भाषा वापरण्यात येते. फडणवीस यांच्याबद्दलही असे शब्द या क्लिपमध्ये ऐकायला मिळतात.

आपण राज्याचे मंत्री आहोत, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे. काही पॅावरफुल मंत्री हे केवळ आपल्याच जिल्ह्यात सर्व सोयी कोरोना काळात नेत आहेत. त्यांनी आपण राज्याचे मंत्री असल्याचे लक्षात ठेवावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथील दौऱ्यात दिला. केंद्र सरकार महाराष्ट्राला पूर्ण मदत करत असल्याचा दावाही त्यांनी केला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख