भाजप आमदाराला पोलिस कोठडीत ठेवले केवळ अंडरवेअर आणि बनियनवर

आमदार मंगेश चव्हाण यांच्या अटकेचे राजकीय पडसादही उमटले...
MLA Mangesh CHavan marhan
MLA Mangesh CHavan marhan

जळगाव : जळगाव दाखल गुन्ह्यात अटकेतील व्यक्ती आमच्या साठी कोठडीत असलेला प्रत्येकच संशयीत आरोपी आहे..मग, तो आमदार, खासदार असो की, इतर कोणी मोठा अधिकारी असे वक्तव्य आमदार मंगेश चव्हाण यांच्या कोठडीवरील गार्ड कर्मचाऱ्यांचे आहे. दोघेही रात्री उशिरा आपसांत पुटपूटत होते.

महावितरणाच्या अधिक्षक अभियंत्याला खुर्चीत बांधल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेतील आमदार मंगेश चव्हाण, यांना रात्री सरकारी भत्त्याचे जेवण देण्यात आले. एमआयडीसी पेालिस ठाण्याच्या केाठडीत असलेल्या आमदार महाशयांना इतर संशयीत अरोपींना कोठडीत दिल्या जातात तशाच सुविधा मिळाल्या. (कोठडीचा कुबट वास, काना भवती घोंगावणारे डास,चिकट घाम)आहेत. आमदारांना सरकारी पिस्तुलधारी सुरक्षारक्षक पुरवला जातो..येथेही सुरक्षा रक्षक तोच आहे..खाकी धारी मात्र. तो जेलगार्ड असून कोठडीच्या गजांच्या दुसऱ्या बाजुला आहे..पिस्तुल ऐवजी रायफल त्याच्या हाती आहे. कोठडीत संशयितांना अंतवस्त्रातच ठेवण्याचा नियम आहे. त्यामुळे आमदारही केवळ अंडरवेअरवरच पोलिस कोठडीत आहेत. सतरंजीचे अंथरूण व सोलापूरी चादरींचे पांघरुण आहे.

आमच्यासाठी कैदीच
ऐरवी हायप्रोफाईल व्यक्तींना पेालिस केाठडीत व्हिआयपी सुविधा दिल्याचे ऐकण्यात वाचण्यात आले आहे. येथे मात्र, घडले उलटेच व्हीआयपी व्यक्तीलाही कोठडीत आल्यावर भेदभाव न करता इतर संशयीता प्रमाणेच वागणुक होती. आपल्यासाठी गजांच्या त्या बाजुला असणारा कोणी बी..असेा तो, संशयीत आरोपीच आहे..त्याच्या साठी नोकरी धोक्यात घालता येणार नाही..अशी चर्चा रात्री उशिरा कानोसा घेतला असता पोलिस ठाण्यात होती.

आमदाराच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल

एमआयडीसी पोलीस ठाण्यात अटकेतील आमदार मंगेश चव्हाण याच्याशी बोलतांना व्हिडीओ शुटींग करणाऱ्या कार्यकर्त्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामाची गोपनियता भंग केल्याप्रकरणी प्रवीण मराठे विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाळीसगाव तालुक्यातील आमदार मंगेश चव्हाण यांनी महवितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना शिवीगाळ करुन दोरीने बांधल्या प्रकरणी समर्थकांसह अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर आमदारासह एकुण ३१ संशयीतांना न्यायालयाने तीन दिवस पेालिस रिमांडवर पाठवले आहे. आमदार साहेबर कोठडीत असल्याने २७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रविण शिवाजी मराठे (वय-४५) रा. हिरापूर रोड इच्छादेवी नगर, चाळीसगाव) हा भेट घेण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आला. लॉकअप गार्डजवळ मोबाईल मध्ये शुटींग करुन ती सोशल मिडीयावर टाकतांनाच गार्ड कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. तत्काळ त्याला हटकले असता त्याच्या मोबाईल मध्ये शुटींग सुरु असल्याचे निर्दषनास आले. पोलिस नाईक राजेंद्र ठाकरे यांच्या तक्रारीवरुन लॉकअप गार्डची विनापरवानगी शुटींग करुन गोपनियतेचा भंग केल्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास उपनिरीक्षक विशाल सोनवणे करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com