`सुशांत`ची आरती संपताच ते आता `पूजा` करु लागले.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येवरूनभारतीय जनता पक्षाने केलेल्या राजकारणावर रामदास फुटाणे यांचे कविमनदेखील हळहळले. त्यांनी या विषयावरील बातम्यांचे माध्यमांनी दिवसभर दळलेले दळण थांबवा आणि देशापुढील गंभीर प्रश्नांकडेही लक्ष द्या, या शब्दात राजकारणी व माध्यमांवर कोरडे ओढले आहे.
Ramdas Phutane
Ramdas Phutane

नाशिक : पूजा चव्हाणच्या आत्महत्येवरुन भारतीय जनता पक्षाने केलेल्या राजकारणावर रामदास फुटाणे यांचे कवी मन देखील हळहळले. त्यांनी या विषयावरील बातम्यांचे माध्यमांनी दिवसभर दळलेले दळण थांबवा आणि देशापुढील गंभीर प्रश्नांकडेही लक्ष द्या, या शब्दात राजकारणी व माध्यमांवर कोरडे ओढले आहे.  

यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर आपला एक व्हीडीओ व्हायरल केला आहे. राजकारण्यांना आणि विशेषतः भाजपला अनुषंगून ते म्हणाले, तुम्हाला राजकारणापलिकडे काहीच सुचत नाही. जेव्हा त्या मुलीचे आई-वडील सांगतात, की बाबांनो या बातम्या बंद करा. तुम्हाला त्यांच्या भावनांची काहीच कदर करावीशी वाटत नाही. त्यांच्याशी तुम्हाला काहीच देणे घेणे नाही. तुम्ही तुमची दुकानदारी चालु ठेवता. कशासाठी चालेल आहे हे. सुशांतच्या वेळेस काय केले तुम्ही?. काय झाले त्या केसचे?. दोन महिने सतत खोट्या बातम्या लोकांच्या कानावर आणि डोळ्यांवर आदळत ठेवल्या. त्याचा रिझल्ट काय झाला?. आणखी दोन तीन काही  मोठ्या घटना घडल्या,  की तुम्ही पूजालाही विसराल. पोलिस तपास करीत आहेत. पोलिसांना तपास करु द्या. त्यातून काही तरी निष्पन्न होईल. दोषांना शिक्षा होईल. 

ते म्हणाले, तुम्ही सगळ्यांनीच हे जे भाडवल, दुकानदारी सुरु केली आहे, त्याचं खर म्हणजे दुःख वाटते आहे. हे सगळे पाहिले की, मला आता त्या दोन दोन ओळीच्या कविता लिहायलाही खुप कंटाळा आला आहे. परंतु दोन वेळी यातील अशा आहेत, की त्या काहींना आवडणार माहीत. 

द्वेषाचा भूतकाळ पुन्हा पुन्हा स्मरू लागले,
आणि सुशांतची आरती संपताच,
आता पूजा करू लागले. 
तेच तेच पीठ जात्यात दळतात,
रिकाम्या सुपाकडे पुन्हा पुन्हा वळतात.

 

ते व्यथित झाले आहेत. ते म्हणाले, अरे, ज्या सुपात दाणेच नाहीत. त्यात नुसतेच तेच तेच दळण दिवसभर चालले आहे. हे बंद करा. काय बातमी द्यायची ती एकदाच द्या. पण दिवसभर त्याच बातम्या?. महाराष्ट्रात याच्यापेक्षा काहीच चांगले घडत नाही का?. रचनात्मक कार्य काहीच घडत नाही?. महाराष्ट्रात काहीच विचारवंत नाहीत?. यापेक्षाही आपले गंभीर प्रश्न आहेत, त्याबद्दल आपण का बोलत नाही?. 

ते म्हणाले, लोकसंख्या वाढ ही अतिशय गंभीर बाब आहे, त्याबद्दल आपण का बोलत नाही?. आज 130 कोटी लोकसंख्या आपण पाहतो, वाचतो. बोलता बोलता वीस वर्षात ती दिडशे कोटी होईल. तीस वर्षात दोनशे कोटी होतील. हा गंभीर प्रश्न नाही का?. इतक्या लोकांना आपण पिण्याचे पाणी देऊ शकतो का?. रोजगार देऊ शकतो का?. धान्य देऊ शकतो का?. सक्तीचे कुटुंब नियोजन ही काळाची गरज आहे. यावर सगळे पक्ष का गप्प आहेत. माध्यमे देखील गप्प?. देशाच्या हिताचे गंभीर प्रश्न आपल्या पुढे आहेत. त्यावर काहीच होताना दिसत नाही. पुजा चव्हाणचा खुन आहे, की आत्महत्या आहे, यावर राजकारण कसे करता येईल.  माझाच पक्ष किती निर्मळ आहे हे सांगण्याचा प्रयत्न होतो आहे. संधी अभावी या देशात अनेक लोक चारित्र्यवान आहेत. ते चारित्र्याच्या गप्पा मारतात, मात्र बघत नाहीत, की आपल्याच पक्षात काय काय लोक आहेत. कसे कसे लोक आहेत. यासंदर्भात मागे काही साधू संत जेलमध्ये गेलेले आहेत, ते आपण पाहिले आहे. यावर त्यांनी कवितेच्या ओळी केल्या,

कधी कधी सरस्वतीचा मोर होऊन प्रतिभावंत,
कधी कधी सिंहासनाचा मुकुट होऊन राजकारणी,
लक्ष्मीच्या स्पर्शाने  शय्येवर पहुडलेला असतो,
आणि चारित्र्यवान मनातसुद्धा एक बाबा, बापू दडलेला असतो. 
बाबा, बापू कधी नजरेने, कधी स्पर्शाने व्यक्त होतो. 
वासनेचा आसक्त होतो आणि पोलिसांची बेडी दिसताच,
हातातला गजरासुद्धा विरक्त होतो.  

... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com