महापौरांनी भाजप नेत्यांच्या विकासकामांना लावली कात्री!

महापौरांनी कामांमध्ये घट करताना या दोन्ही प्रकल्पांना कात्री लावली. त्यातून त्यांनी स्वपक्षाच्या श्री. गिते व माजी महापौर रंजना भानसी यांच्याबाबत धक्कातंत्र अवलंबले.महापौरांनी स्वपक्षाच्या भाजप नेत्यांच्या कामांना कात्री लावली!
Satish Kulkarni
Satish Kulkarni

नाशिक : शहरातील त्रिमूर्ती चौक, मायको सर्कल येथे दोन उड्डाणपूल तयार होत आहेत. (Two Flyover bridg`s work is on in the city) असे असताना, पंचवटीमध्ये पेठ रोडवर शरदचंद्र पवार मार्केटसमोर व दिंडोरी रोडवर प्रत्येकी एका उड्डाणपुलाचा समावेश स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात सभापती गणेश गिते (Standing committee Chairmen Ganesh Gite given approval for two flyovers in Panchvati) यांनी केला होता. मात्र, महापौरांनी कामांमध्ये घट करताना या दोन्ही प्रकल्पांना कात्री लावली. (Mayor cuts two new flyover and divert funds to own wards work) त्यातून त्यांनी स्वपक्षाच्या श्री. गिते व माजी महापौर रंजना भानसी यांच्याबाबत धक्कातंत्र अवलंबले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक निधीची पळवापळवी ही बाब नित्याची आहे. मात्र महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्वपक्षातील नगरसेवकांच्या कामांना कात्री लावली. त्यांचा निधी स्वत:च्या प्रभागात वळविला आहे. महापौरांनी मंजूर केलेल्या अंदाजपत्रकातून हा प्रकार स्पष्ट झाला आहे. 

पंचवटी विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांना कात्री लावली. महापौरांनी स्वत:च्या प्रभागात निधी वळवून स्वत:चे स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न केला. त्यात स्थायी समिती सभापती गणेश गिते व माजी गटनेते जगदीश पाटील, माजी महापौर रंजना भानसी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महापौर कुलकर्णी यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाचा ठराव प्रशासनाकडे सुपूर्द केला. त्यापूर्वी स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकात पंचवटी विभागातील कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला होता. स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची वाढ करत महापौर कुलकर्णी यांनी कामांमध्ये घट करताना पंचवटी विभागातील विशेषत: प्रभाग चारमधील कामांना कात्री लावली आहे. ती कामे पूर्व विभागातील प्रभाग २३ मध्ये म्हणजे स्वत:च्या प्रभागामध्ये वळवत आगामी निवडणुकीतील त्यांचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. 

मात्र, अंदाजपत्रकात दर्शविलेल्या विकासकामांचा फुगा महापालिकेचे अर्थकारण बिघडल्याने फुटणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक बनल्याने निधीअभावी अनेक कामे रेंगाळणार आहेत. त्यामुळे महापौरांनी त्यांच्या प्रभागात चालविलेल्या विकासकामांच्या बुलेट ट्रेनला ब्रेक लागणार आहे.

मोजक्या प्रभागांवर संक्रांत
माजी गटनेते जगदीश पाटील यांनी मोठ्या प्रमाणात प्रभाग चारमध्ये ४३ कोटींच्या कामांचा समावेश केला होता. मात्र, महापौरांकडून कात्री लावताना याच कामांवर गंडांतर आणल्याने भाजपमध्ये निधी पळवापळवी वरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वज्रेश्‍वरीनगरमध्ये घरकुल योजना राबविणे, गुंजाळनगर भागात रिंग रोड विकसित करणे, उड्डाणपूल बांधणे, क्रीडांगणे विकसित करणे या महत्त्वाच्या कामांना कात्री लागली आहे. प्रभाग २३ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, वडाळा चौफुली ते पूना रोडपर्यंत रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण करणे, खुल्या नाल्यांवर स्लॅब टाकणे आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश महापौरांनी केला.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com