Corona Effect : विश्वास बसणार नाही पण; IT इंजिनिअर विकतोय शहाळे!

कालपर्यंत लक्‍झरी म्हणजे काय याचे प्रतीक असलेले आयटी इंजिनिअर तुम्हाला रस्त्यावर शहाळे घेता का शहाळे असा आग्रह करतांना दिसेल. हे घडले आहे, ते सुद्धा चक्क नाशिक शहरात. ही शहाळे सोलता सोलता त्यांच्या हातांना फोड आलेत. मात्र "कोरोना'ला पराभूत करण्याचा त्यांचा ध्यास जराही कमी झालेला नाही.
Corona Effect : विश्वास बसणार नाही पण; IT इंजिनिअर विकतोय शहाळे!

नाशिक : कोरोनाचे आजुबाजुला लक्ष टाकले तर त्या धक्का देऊन जागे करतील अशा आहेत. कालपर्यंत लक्‍झरी म्हणजे काय याचे प्रतीक असलेले आयटी इंजिनिअर तुम्हाला रस्त्यावर शहाळे घेता का शहाळे असा आग्रह करतांना दिसले. हे घडले आहे, कोरोनामुळे ही शहाळे सोलता सोलता त्यांच्या हातांना फोड आलेत. मात्र "कोरोना'ला पराभूत करण्याचा त्यांचा ध्यास जराही कमी झालेला नाही. 

मोठ्या पगाराचे पॅकेज मिळविण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात तरूणांचा ओढा असतो. आयटी क्षेत्रात काम सुरू केल्यानंतर उत्पन्न वाढते. उत्पन्न वाढले, की खर्च वाढतात, लाइफस्टाईल बदलते. मुलांची शाळा, घर, गाडी, जेवण, पाणी, चहा- कॉफी सगळेच कसे हायफाय असते. यामध्ये खर्च वाढत जातात. मात्र कोरोनाने ही साखळी तोडायचा चंगच बांधला आहे. त्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. काहींनी अर्धा पगार देत "वर्क फ्रॉम होम' सुरु केले. या काळात इतर भत्ते मिळणेही कमी झाले आहे. त्यामुळे खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी "आयटी' क्षेत्रात काम करणारे तरूण जुना गंगापूर नाका परिसरात शहाळे विक्री करत आहेत. खर्च भागविण्यासाठी त्यांनी शहाळे विक्रीचा मार्ग शोधला आहे. शहाळे विक्रीतही त्यांचा टापटीपपणा, सॅनीटायझर, ऑनलाईन पेमेंट, नम्रता अन्‌ बाजारापेक्षा स्वस्तात विक्री. त्यांच्याकडे शहाळे घेतले तर त्यांच्या चाकोरीबाहरेच्या या धाडसी निर्णयासाठी त्यांचे कौतुक केल्यावाचून राहणार नाही, याची गॅरंटी. 

लॉकडाऊन नंतर हळुहळु काही उद्योग सुरू होत असले, तरी आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्या अजूनही बंदच आहेत. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. त्यांचे इतर भत्तेही बंद केले आहेत. त्यामुळे खर्चाच्या तोंडमिळवणीसाठी उत्पन्नाचे मार्ग शोधत आहेत. आयटी क्षेत्रात असल्याने खर्चिक सवयी असतात. पगार कपातीने घर, गाडी, मुलांची शाळा, क्रेडीट कार्ड, एलआयसी, मेडीक्‍लेम, मोबाईल बील असे विविध खर्चांची तोंडमिळवणी करणे अवघड झाले आहे. त्यामुळे राहुल सुर्यवंशी आणि आशिष वाडीले या दोन तरूणांनी एकत्र येऊन शहाळे विक्रीला सुरूवात केली आहे.

हे दोघेही सकाळी लवकर उठून ते होलसेल मार्केटमधून शहाळे खरेदी करतात. त्यानंतर दिवसभर जुना गंगापूर नाका परिसरात प्रमोद महाजन उद्यानालगत आपल्या चारचाकी वाहनातून शहाळे विक्री करतात. सकाळी सकाळी त्यांची बोटे किबोर्डवर झपझप चालतात. दुपारी शहाळे सोलतात. लढवय्यांचे हेच असते कौशल्य अन् धैर्य. 

दहा वर्षांपासून आयटी क्षेत्रात काम करत आहे. घरूनच काम करण्यास सांगितले आहे. कंपनीचे कामही करतो आणि उरलेल्या वेळेत शहाळे विक्रीचा व्यवसाय आम्ही करतो. त्यातून घरखर्चाला हातभार लागत आहे. - आशीष वाडीले. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com