या जिल्ह्यात होम क्वारंटाईन व्यक्ती रस्त्यावर दिसल्यास आता गुन्हा दाखल होणार!

जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी व साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे.
corona 11
corona 11

जळगाव : हातावर क्वारंटाईन शिक्का असलेले व्यक्तीनी घरात राहणे सक्तीचे आहे, परंतु अनेक व्यक्ती रस्त्यावर फिरतांना दिसतात. आता अशा व्यक्ती रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कोविड सेंटर नियंत्रण अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात अनेक जण बाहेरगावाहून आले आहेत. त्यांना क्वारंटाईन करून त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले आहेत. त्यांना तब्बल चौदा दिवस होम क्वारंटाईन सक्तीचे आहे. मात्र काही नागरीक घरात न राहता रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून इतरांनाही धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. जळगाव जिल्ह्यात "कोरोना'संशयीतांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे आता शासनाने कठोर निर्णय घेण्याची भूमिका घेतली आहे.

ज्या नागरिकांना "होमक्वारंटाईन'शिक्के मारले आहेत, ज्याचां चौदा दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला नाही, तरीही ते रस्त्यावर फिरत आहेत. अशा नागरिकांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. याबाबतचे आदेश इंन्सिडंन्ट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी व साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून या कालावधीत जे बाहेर गावावरून नागरिक आपल्या जिल्ह्यात आलेले आहे त्यांना 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु असे निदर्शनात आले की, काही नागरिक त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला असताना सुद्धा घरी न राहता इतरत्र फिरत आहे हे अतिशय गंभीर आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जे नागरिक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांच्या चौदा दिवसांचा होमक्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही. अशा नागरिकांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. घरात न राहता बाहेर फिरतांना आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत.

ही बातमी पण वाचा : सोमवारची सकाळ कोल्हापूरवासियांसाठी धक्‍कादायकच!


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काल एकाच दिवशी 14 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने धक्का बसलेल्या कोल्हापुरवासियांची आजची सकाळही धक्कादायकच ठरली. मुंबईसह पुण्याहून आलेल्या पाच जणांचे अहवाल आज पॉझीटीव्ह आले. या पाचजणांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 56 वर पोहचली असून आतापर्यंत यातील 12 जण कोरोनामुक्त होऊन घरीही गेले आहेत. आज पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांत एक जण शहरातील राजारामपुरी परिसरात राहणारा आहे.

रविवारी (ता. 17) पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या 14 जणांत छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात हजर होण्यासाठी सोलापूरहून आलेल्या महिला डॉक्‍टरचा समावेश आहे. संबंधित डॉक्‍टर महिला सोलापूरहून आली होती, हा जिल्हा रेडझोनमध्ये असल्याने तिचा स्वॅब घेऊन तो तपासणीसाठी पाठवला होता, त्यात अहवाल पॉझीटीव्ह आला. याशिवाय शाहुवाडी तालुक्‍यातील 49 वर्षीय पुरूष, आजरा येथील 42 वर्षीय पुरूष व भुदरगड तालुक्‍यातील 32 वर्षीय तरूणाचाही समावेश आहे. या सर्वांनी तीन दिवसांपुर्वी मुंबई ते कोल्हापूर प्रवास केला होता. कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवून त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. काल हे सर्वजण पॉझीटीव्ह आले.

आज सकाळी पाच जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले. यात शहरातील राजारामपुरी परिसरातील एकाच समावेश आहे. संबंधित व्यक्ती साताराहून कोल्हापुरात दोन दिवसांपुर्वी आली होती. कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने ते तपासणीसाठी सीपीआरमध्ये दाखल झाले होते. त्याचदिवशी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता आज सकाळी त्याचा अहवाल प्राप्त झाला, त्यात त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या जवळच्या संपर्कातील दोन मुलांनाही आज ताप आल्याने त्यांनाही सीपीआरमध्ये दाखल करून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अन्य चार रूग्णांत दोन रूग्ण आजरा तालुक्‍यातील तर दोन भुदरगड तालुक्‍यातील आहेत. हे चौघेही मुंबईहून कोल्हापुरात आले होते. छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयाकडे 820 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत 360 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. गेल्या 45 दिवसांत सीपीआरमध्ये साडे सतरा हजार जणांचे तपासणी करण्यात आली असून रोज मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरीकांनी सीपीआरमध्ये तपासणीसाठी प्रचंड गर्दी केली आहे. त्याचा मोठा ताण यंत्रणेवर येत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com