देशातील सर्वाधिक कोरोना बाधीत रुग्ण महाराष्ट्रात ! - Highest covid19 patients in maharashtra. alert for people, Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

देशातील सर्वाधिक कोरोना बाधीत रुग्ण महाराष्ट्रात !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

देशात आज 1.47 लाख कोरोना बाधीत रुग्ण आहेत. यातील एक तृतीयांश अर्थात बावन्न हजार 956 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. अर्थात सर्वाधीक 19.94 लाख कोरोनामुक्त रुग्ण देखील याच राज्यात आहेत. त्यामुळे आजच्या घडीला महाराष्ट्र ही कोरोनाची राजधानी होऊ पहात आहे.

नाशिक : देशात आज 1.47 लाख कोरोना बाधीत रुग्ण आहेत. यातील एक तृतीयांश अर्थात बावन्न हजार 956 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. अर्थात सर्वाधीक 19.94 लाख कोरोनामुक्त रुग्ण देखील याच राज्यात आहेत. त्यामुळे आजच्या घडीला महाराष्ट्र ही कोरोनाची राजधानी होऊ पहात आहे. त्यामुळे राज्य सरकार लवकर जागृत झाल्याने आगामी काळात नागरिकांचा प्रतिसाद कळीचा मुद्दा ठरणार आहे. 

गतवर्षी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्यापासून आत्तापर्यंत देशात एक कोटी दहा लाख 556 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. यातील एक कोटी 6 लाख 97 हजार 393 रुग्ण आजपर्यंत बरे झाले आहेत. आज देशात एक लाख 47 हजार 196 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात पुढे आहे. राज्यात आजवर एकवीस लाख 884 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असुन एकोणीस लाख 94 हजार 947 रुग्ण बरे झाले आहेत. आजच्या घडीला बावन्न हजार 956 रुग्ण आहेत. त्याची कल वाढता आहे. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था सगळेच सावध झाले आहेत. राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विविध शहरांत विनामास्क फिरणा-या नागरिकांची तपासणी करुन त्यांना दंड केला जात आहे.  सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना राज्य शासनाने बंदी घातली. सार्वजनिक समारंभ तसेच सभागृह, मंगल कार्यालयांत विवाहांना किती गर्दी असावेत याचे निकष निश्चित केले आहेत. त्याचे उल्लंघण झाल्यास कारवाई केली जाणार आहे. मात्र ही स्थिती सगळ्यांचीच काळजी वाढविणारी आहे. त्यामुळे केवळ राज्य शासनाने उपाययोजना करुन ते पुरेसे ठरणार नाही. जनतेचा प्रतिसाद हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे.

यासंदर्भात `COVID19INDIA` या संकेतस्थावर त्याचे नियमित मॅानिटरींग होत आहेत. देशात 21.2 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. 1.10 कोटी कोरोना लशीचे डोस वितरीत करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्राला 9.30 लाख डोस प्राप्त झाले आहेत. उत्तर प्रदेशला 11.5 लाख, पश्चिम बंगालला 6.9 लाख, राजस्थानला 8.20 लाख, मध्य प्रदेशला 6.40 लाख, कर्नाटक- 6.6 लाख, आंध्र प्रदेशला 5 लाख तर केरळला 4.40 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. मात्र देशातील कोरोनाग्रस्तांचा ट्रेंड लक्षात घेता महाराष्ट्रासह मोजक्या राज्यांसाठी हा सावधानतेचा इशारा आहे. 
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख