‘राष्ट्रवादी’च्याच लोकांसोबत फोटो काढून पक्ष प्रवेश दाखवण्याचा खडसेंचा केविलवाणा प्रयत्न:गिरीश महाजन - Girish Mahajan Criticizes Ekanath Khadse Over Photo session | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

‘राष्ट्रवादी’च्याच लोकांसोबत फोटो काढून पक्ष प्रवेश दाखवण्याचा खडसेंचा केविलवाणा प्रयत्न:गिरीश महाजन

कैलास शिंदे
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून ‘राष्ट्रवादी’कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जातील असे त्यांना वाटले. मात्र कोणीच त्यांच्या मागे जात नसल्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्याच कार्यकर्त्यासोबत फोटो काढून प्रवेश केल्याचा दाखविण्याचा एकनाथ खडसे यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना केला आहे.

जळगाव : एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून ‘राष्ट्रवादी’कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जातील असे त्यांना वाटले. मात्र कोणीच त्यांच्या मागे जात नसल्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्याच कार्यकर्त्यासोबत फोटो काढून प्रवेश केल्याचा दाखविण्याचा एकनाथ खडसे यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. असा आरोप भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना केला आहे.

जामनेर मतदार संघातील दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’पक्षात प्रवेश केल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आला होता. त्यावर बोलतांना गिरीश महाजन म्हणाले, ''अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे, एकनाथ खडसे यांचा हा अत्यंत केविलवाणा प्रकार आहे. आपण भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या सोबत येतील असा त्यांचा दावा होता, परंतु आज एकनाथ खडसे यांच्या सोबत कोणीच पक्ष सोडून जात नसल्यामुळे आता ते ‘राष्ट्रवादी’ कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच बोलावून त्यांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे टाकून प्रवेश केल्याचे दाखविले जात आहे,''

जामनेर तालुक्यातील दोनशे कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. परंतु आताही आपला दावा आहे, की आपला एकही कार्यकर्ता गेलेला नाही, त्यांच्या सोबत गेलेले कार्यकर्ते भाजपचे आहेत हे खडसे यानी सिध्द करून दाखवावे असे आवाहनही महाजन यांनी दिले आहे. आपल्या सोबत कोणीही आलेले नाही, म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांना दाखविण्यासाठी खडसे यांचा हा केविलवाणा प्रकार सुरू असल्याचा आरोपही महाजन यांनी केला आहे.

मुक्ताईनगरचा विचार करा
खडसे यांच्यावर टिका करतांना त्यांनी म्हटले आहे, की खडसे यांनी जामनेरचा मुळीच विचार करू नये. त्याची चितांही करू नये. त्यांनी सद्य स्थितीत मुक्ताईनगरची चिंता करावी, कारण त्यांच्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील जनधार पूर्णपणे कमी झाला आहे. त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यावे.

खडसेंची प्रतिमा काढली
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून काढण्यात आलेल्या प्रतिमेच्या वादाबाबत ते म्हणाले, "एकनाथ खडसे यांच प्रतिमाआम्ही त्यांनीराष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवशी काढली, त्यानंतर कोणाचीही प्रतिमा काढण्याचा संबध येत नाही. मात्र सद्या दिवाळीनिमित्त कार्यालयाची रंगरंगोटी करण्यात येत असल्याने सर्वच प्रतिमा आम्ही काढल्या आहेत.त्यामुळे (कै.)निखील खडसे यांची प्रतिमा काढण्याचा संबध नाही,"

अर्णववर सुडाच्या भावनेने कारवाई
अर्णव गोस्वामी यांच्यावरील कारवाईबाबत ते म्हणाले, "राज्य शासन आता सुडाच्या भावनेने कारवाई करीत असल्याचे दिसत आहे. आमच्या विरूध्द कोणी बोलले तर त्यांच्या विरोधात आम्ही कारवाई करू हाच संदेश राज्य शासन देत आहे. पत्रकारांचीही गळचेपी आता राज्य शासनाने सुरू केली आहे."
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख