एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण  - Eknath Khadse's corona report positive | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे. 

जळगाव : भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना आज (ता. 19 नोव्हेंबर) कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली. पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्यात आले आहे. 

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा कोरोना रिपोर्ट दोन दिवसांपूर्वीच पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर नाथाभाऊ यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतले होते, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा खानदेशचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला होता. 

माजी मंत्री एकनाथ खडसे यांची अँटिजेन आणि आरटीफीसीआर या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र, सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात हलविण्यात आले आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. 

दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रोहिणी खडसे या जळगावमधील खासगी रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत. त्यांच्यानंतर दोन दिवसांनी नाथाभाऊ यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

दरम्यान, आपल्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनीही कोरोनाची तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही नाथाभाऊंनी केले आहे. 

म्हणून शरद पवारांचा खानदेश दौरा रद्द झाला होता 

दरम्यान, रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांचे वडील एकनाथ खडसे यांनी स्वतःला क्वारंटाईन करुन घेतले होते, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा खानदेश दौरा रद्द झाला होता. 

माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या ऍड. रोहीणी खडसे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर खडसे यांची जिलह्यात राजकीय बैठकांसाठी उपस्थिती होती. मात्र त्यांनी आपली तपासणी केली असता त्याचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. ऍड. रोहिणी खडसे यांनी याबाबत ट्‌विटद्वारे माहिती दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती उत्तम आहे. मात्र सावधानता म्हणून मी रूग्णालयात दाखल होत आहे. 

शरद पवार खानदेश दौऱ्यावर यापुर्वी देखील म्हणजे मार्च महिन्यात येणार होते. मार्च महिन्यात चांदसर (ता. धरणगाव) येथे कार्यक्रमानिमित्ताने येणार होते. परंतु, राज्यात कोरोनाला सुरवात झाल्यानंतर हा कार्यक्रम देखील ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. तर येत्या 20 व 21नोव्हेंबरला शरद पवार यांचा दौरा निश्‍चित केला होता. परंतु धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा होणारा दौरा रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह शिवाय एकनाथ खडसे देखील क्‍वारंटाईन असल्याचे सांगण्यात येत आल्यामुळे दौरा रद्द करावा लागला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख