नाराज खडसेंच्या घरात भाजप प्रदेशची दोन पदे 

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला आहे. आज (ता. 3 जुलै) जाहीर झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत खडसे यांना विशेष निमंत्रित म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. याचबरोबर त्यांचा सूनबाई खासदार रक्षा खडसे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Eknath Khadse, Raksha Khadse has been elected to the BJP state executive
Eknath Khadse, Raksha Khadse has been elected to the BJP state executive

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला आहे.

आज (ता. 3 जुलै) जाहीर झालेल्या पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत खडसे यांना विशेष निमंत्रित म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. याचबरोबर त्यांचा सूनबाई खासदार रक्षा खडसे यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनीही यापूर्वी राज्याच्या कार्यकारिणीत अनेक वर्षे सरचिटणीस म्हणून काम केले आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांना संधी मिळणार काय? याकडेच सर्वांचे लक्ष होते. भाजप सत्तेवर असताना खडसे यांना मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पक्षातर्फे अनेक ठिकाणी डावलण्यात येत होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मुक्ताई नगर मतदार संघातून उमेदवारीही नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर पक्षातर्फे वर्णी लागणार असल्याची चर्चा होती, त्यांचे नावही केंद्रांकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर ऐनवेळी त्यांचे नाव कापण्यात आले आणि त्यांची विधान परिषदेवरची संधीही हुकली. 

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत तरी खडसे यांचे नाव कायम राहणार का? याकडे सर्वाचे लक्ष होते. एकनाथ खडसे तब्बल तेरा वर्षे प्रदेश कार्यकारिणीचे सरचिटणीस होते. त्यानंतर त्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या वेळी ते विशेष निमंत्रित सदस्य राहणार की नाही, याबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यामुळे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी समितीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष होते. 

आज जाहीर झालेल्या समितीत पक्षाने एकनाथ खडसे यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून कायम ठेवले आहे. त्यांच्या बरोबर माजी मंत्री गिरीश महाजन यांचाही विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये सामावेश करण्यात आला आहे. 

एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांना प्रथमच प्रदेश समितीच्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

एकनाथ खडसे यांचा विशेष निमंत्रीत सदस्यात समावेश आणि खासदार रक्षा खडसे यांची चिटणीसपदी केलेली नियुक्ती म्हणजे पक्षाने आता नव्याना संधी आणि जुन्यांनी मार्गदर्शक राहावे, असा एक प्रकारे संदेश दिल्याचे मानले जात आहे. या सोबतच जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार स्मिता वाघ, अशोक कांडेलकर यांचाही समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

रक्षा खडसे या दुसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. रक्षा खडसे यांनी कोथळी (ता. मुक्ताई नगर) गावच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय जीवनास सुरुवात केली आहे.

जळगाव जिल्हा परिषदेत त्या शिक्षण समिती सभापतीही होत्या. त्यानंतर त्यांनी 2014 मध्ये रावेर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली व त्या खासदार झाल्या. याच मतदार संघातून 2019 मध्येही त्या मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com