'ती' मागणी फडणवीसांचीच; मग होऊन जाऊदे चौकशी : एकनाथ खडसे - Ekanath Khadse Wants inquiry into Jalayukta Shivar | Politics Marathi News - Sarkarnama

'ती' मागणी फडणवीसांचीच; मग होऊन जाऊदे चौकशी : एकनाथ खडसे

कैलास शिंदे
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

जल युक्त शिवार योजनेची  चौकशी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनीच केली होती. त्यामुळे आता ही लवकर होवून त्यातून तथ्ध बाहेर यावे, असे मत भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे

जळगाव :  जल युक्त शिवार योजनेची  चौकशी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनीच केली होती. त्यामुळे आता ही लवकर होवून त्यातून तथ्ध बाहेर यावे, असे मत भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.              

युती शासनाच्या काळात झालेल्या जल युक्त शिवार योजनेची 'एस आय टी' मार्फत चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे माजी मुखममंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे. या बाबत भाजप नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता 'सरकारनामा'शी बोलताना ते  म्हणाले, "जल युक्त योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप सत्ताधारी महविकास आघाडीतर्फे करण्यात येत होता. त्यावेळीं देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार शासनाने एस आय टी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती लवकरात लवकर करून याचे तथ्य जनतेसमोर  आणावे,''

दरम्यान, जलयुक्त शिवारची चौकशी म्हणजे महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या श्रमाचीच चौकशी करणार काय?, असा सवाल भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. जलयुक्त शिवारच्या चौकशीतून ठाकरे सरकार स्वतःच तोंडावर पडेल, असा दावाही त्यांनी केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच देवेंद्र फडणवीस यांची राज्यात केलेल्या पाणीप्रश्‍नाबाबत तोंड भरून कौतुक केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यातील ठाकरे सरकारने जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. जलयुक्त शिवार हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट होता. या योजनेतून प्रत्येक शिवारात पाणी खेळेल असे स्वप्न राज्यातील शेतकऱ्यांनी पाहिले होते. तत्कालीन सरकारनेही हा प्रकल्प प्रतिष्ठेचा केला होता आणि त्यासाठी गाजावाजा करीत मोठा खर्चही केला होता. मात्र जलशिवारबाबत कॅगने ताशेरे ओढले होते. त्यानंतर अर्थात थेट बोट दाखविले गेले ते फडणविसांकडे. 
 जलयुक्त शिवार योजनेसाठी हजार कोटी खर्च झाला, मात्र त्याचा फायदा झाला नाही. ही योजना राबवूनही राज्यात टॅंकरची संख्या वाढली, भूजल पातळी मात्र वाढली नाही, असे आक्षेप घेण्यात आले आहेत. 

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख