खडसेंना 'ईडी'ची तारीख आली की कोरोना होतो... - Ekanath Khadse Gets Corona when he gets ED Notice Say Girish Mahajan  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

खडसेंना 'ईडी'ची तारीख आली की कोरोना होतो...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 मार्च 2021

गिरीश महाजन यांना कोरोनाची (Corona) लागण झाली होती. मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटल (St.George Hospital) येथे त्यांनी उपचार घेतले. त्यातून ते बरे झाले. आज जळगाव (Jalgaon) येथे त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय  अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Ekanath Khadse) यांना 'ईडी'ची (ED) तारीख आली की त्यांना कोरोना होतो, असा सणसणीत टोला भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला आहे. जळगाव येथे पत्रकारांशी ते बोलत होते. Ekanath Khadse Gets Corona when he gets ED Notice Say Girish Mahajan 

गिरीश महाजन यांना कोरोनाची (Corona) लागण झाली होती. मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटल (St.George Hospital) येथे त्यांनी उपचार घेतले. त्यातून ते बरे झाले. आज जळगाव (Jalgaon) येथे त्यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

जळगावसह राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील सरकारचे डोके ठिकाणावर नाही. मंत्र्यांचा कोणाचा कोणाला पायपोस नाही. सरकारने आता तरी तातडीने उपाययोजना कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले. Ekanath Khadse Gets Corona when he gets ED Notice Say Girish Mahajan 

खडसे यांनी महाजन यांना झालेल्या कोरोना बाबत आक्षेप घेतला होता. महाजन यांना कोरोना कसा झाला, असेही त्यांनी विचारले होत. त्याला उत्तर देताना महाजन म्हणाले की, माझा कोरोना काही खडसे यांच्या सारखा नाही. 'ईडी'ची तारीख आली की खडसे याना कोरोना होतो. ते खासगी दवाखान्यात दाखल होतात. खोटे प्रमाणपत्र तयार करून ते मुंबईत (Mumbai)  फिरत असतात. माझे मात्र तसे नाही मला कोरोनची लागण झाल्यानंतर मी मुंबईत सेंट जॉर्ज या शासकीय हॉस्पिटल मध्ये दहा दिवस उपचार घेतले. माझ्या बायकोला, मुलीला कोरोना झाला त्यांनी सर्वांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख