जळगाव : भाजपचे नाराज नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता प्रवेश होणार आहे. खडसे यांच्या प्रवेशाबाबतची माहिती आपणास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्याचे राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रभैय्या पाटील यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा होती. खडसे राजीमाना देणार असल्याचे 'सरकारनामा'ने सर्वप्रथम वृत्त दिले होते. आता खडसे यांनी अंतीम निर्णय घेतला आहे. काही वेळात खडसे भाजपचा राजीनामा देणार असून उद्या ते काही निवडक निकटवर्तींयांसह मुंबईला जाणार आहेत. काही वेळात स्वतः जयंत पाटील याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे भाजपचे खडसे यांना थांबवण्याचे प्रयत्न फोल ठरल्याचे यावरुन दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाकडूनही खडसेंना थोपविण्याचे प्रयत्न सुरू होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी पक्ष सोडून जावू नये यासाठी चर्चा केली होती. याला खडसे यांनीही दुजोरा दिला होता.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.