जळगाव महापालिकेतील वाद मिटविण्याचे डॉ. भामरेसमोर आव्हान

भारतीय जनता पक्षात संघटनेला प्राथमिकता दिली जाते. संघटन बळकट करण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत केले जाते.
जळगाव महापालिकेतील वाद मिटविण्याचे डॉ. भामरेसमोर आव्हान

जळगाव: भारतीय जनता पक्षातर्फे राज्यातील ग्रामीण व शहरी प्रभारींची नावे जाहिर करण्यात आली आहे. जळगाव शहराच्या प्रभारी पदाची जबादारी खासदार सुभाष भामरे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यांच्या समोर महापालिकेतील वाद मिटविण्याचे आव्हान असणार आहे.

तर प्रा.डॉ.देवयानी फरांदे यांच्याकडे जळगाव जिल्हा ग्रामीणच जबाबदारी असणार आहे. पक्षाचे नेते एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांच्यात समन्वय साधण्याची कसोटी ठरणार आहे.

भारतीय जनता पक्षात संघटनेला प्राथमिकता दिली जाते. संघटन बळकट करण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत केले जाते. ज्याच्याकडे जी जबाबदारी दिली असेल त्यांच्याव्यतीरिकत इतर कोणीही त्यात दखल देत नाही. पक्षात कारवाई करतांनाही संबधिताकडून आलेल्या अहवालानंतरच वरीष्ठ स्तरावर निर्णय घेतले जातात अशी एक पक्षात शिस्त पाळली जात असल्याचे सांगितले जाते. 

जिल्हा व महानगरात पक्षात अर्तगत असलेले वाद मिटवून संघटन बळकट करण्यासाठी जिल्हा प्रभारी पदाची जबबादारी दिली जाते. त्यात हे प्रभारी त्या-त्या ठिकाणचे असेलेले वाद मिटविण्यसाठी प्रयत्नशिली असतात.हा प्रघात आता सर्वच पक्षात आहे. भारतीय जनता पक्षाने आज राज्यातील जिल्हा व महानगराच्या प्रभारींची नियुक्ती जाहिर केली आहे.

भामरेसमोर मनपातील वाद मिटविण्याचे आव्हान
धुळे येथील खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्याकडे जळगाव शहराचे प्रभारीपद देण्यात आले. जळगाव शहरात आमदार भाजपचे आहेत. तर महापालिकेवर सत्ताही भाजपचीच आहे. तब्बल ५७ नगरसेवक भाजपचे आहेत. सद्यस्थित महापालिकेत भाजपमध्ये नगरसेवकांत अंतर्गत वाद सुरू आहेत. भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे हे वाद नगरसेवकांनी मांडले आहेत.मक्त्यावरून तसेच पदावरूनही संघर्ष सुरू आहे. डॉ.भामरे यांचे शांत व सयंमी व व्यक्तीमत्व आहे. महानगरचे प्रभारीपद स्विकारल्यानंतर त्यांना प्रथमच महापालिकेतील हा वाद मिटवावा लागणार आहे.

प्रा.डॉ.फरांदेची कसोटी
जळगाव जिल्हा ग्रामीणच्या प्रभारीपदाची जबाबदारी नाशिक येथील आमदार प्रा.डॉ.देवयानी फरांदे यांच्याकडे देण्यात आली. या अगोदर जिल्हा जिल्हा ग्रामीणचे प्रभारीपद त्यांचे पती सुहास फरांदे यांच्याकडे होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची माहिती आहेच. शिवाय प्रा.डॉ.देवयांनी फरांदे यांना राजकारणाचा अनुभव आहे. त्यांनी नाशिकचे महापौरपद भूषविले आहे. त्या आता आमदार आहेत. 

जिल्हा परिेषदेवर महापालिकेची सत्ता आहे. पक्षाचे दोन खासदार आहेत. तर चार आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत पक्षाला मुक्ताईनगर, रावेर, अमळनेर, येथील जागा गमवावी लागली आहे. पक्षाचे नेते एकनाथराव खडसे व गिरीश महाजन यांचे अंतर्गत वाद असल्याचे श्रेष्ठींनाही माहित आहे. त्यामुळे त्यांचे अंतर्गत वाद मिटवून त्यांच्या एकोपा जोपासण्याठी प्रा.डॉ. फरांदे यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. 

जळगाव जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्षपदाची धुरा पक्षाने आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांच्याकडे नुकतीच सोपविली आहे. त्यामुळे त्यांच्याही जिल्हाध्यक्षपदाच्या कारकिर्दीची सुरूवात होत आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागात पक्षाचे संघटन बळकट करण्याचे जिल्हा प्रभारी म्हणून प्रा.डॉ.देवयांनी फरांदे यांच्यासमोर आव्हान ठरणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com