जिल्हा बँकेसह सहकाराच्या निवडणुकांना कोरोनामुळे ब्रेक!

नाशिक जिल्हा सहकारी बँक, मर्चंट बँक, विविध पतसंस्था, बाजार समित्या आणि सोसायटीसह तब्बल अठराशे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांच्या राजकीय आकाक्षांना ब्रेक लागला आहे.
NDCC Bank
NDCC Bank

येवला : नाशिक जिल्हा सहकारी बँक, मर्चंट बँक, विविध पतसंस्था, बाजार समित्या आणि  सोसायटीसह तब्बल अठराशे मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांच्या राजकीय आकाक्षांना ब्रेक लागला आहे.  सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तब्बल पाचव्यांदा स्थगिती आली आहे. 

ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर सहकाराच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जानेवारी २०२० मध्ये काही ठराव जमा केले आहेत, तर राहिलेल्या ठरावांना १५ ते २२ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. बँकेच्या निवडणुकीसाठी ५ एप्रिलला मतदारयादीही प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, पुन्हा एकदा निवडणुकांना स्थगिती मिळाल्याने मतदार यादीसह जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रमही पुढे ढकलला गेला आहे. मे महिन्यात निवडणुकीची शक्यता होती. पण, आता निवडणूक होणार की नाही, याचे उत्तर कुणाकडेच नाही.

सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील दोन महिन्यांत तीनवेळा स्थगिती उठवली व पुन्हा प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याबाबत आदेश दिलेल्या सहकारी संस्था, २५० पेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका मात्र होणार आहेत. त्यासाठी नियमावली केली जाणार आहे.

मुदतवाढीचा पाचवा खेळ !
कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच निवडणुकांचा खेळ झाला आहे. मात्र, त्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. २०२० मध्ये मार्चअखेरीस या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पहिल्यांदा ३० जून, दुसऱ्यांदा ३० सप्टेंबर, तिसऱ्यांदा ३१ डिसेंबर, तर १६ जानेवारीला चौथ्यांदा ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, रुग्णसंख्या कमी झाल्याने व ग्रामपंचायतीच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्यावर चौथी मुदतवाढ चारच दिवसांनी २० जानेवारी २०२१ ला मागे घेत निवडणुका घेण्याचा नवा आदेश काढला होता. अचानकपणे रुग्णसंख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा ३१ मार्चपर्यंत मुदत आहे त्या टप्प्यावर स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे बाजार समित्यांसह अनेक संस्थांना मुदतवाढ मिळाली असून, काही संस्थांवर प्रशासक आले आहेत.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com