शरद पवार-मोदी भेटीवर चंद्रकांत पाटील यांचे भाष्य  

तरीही काही घडले असेल तर मला त्याबाबतची माहिती नाही.
Chandrakant Patil's commentary on Sharad Pawar-Modi meeting
Chandrakant Patil's commentary on Sharad Pawar-Modi meeting

नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (ता. १७ जुलै) दिल्लीत भेटी झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात लगेच उमटायला सुरुवात झाली. या भेटीवर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही नाशिकमध्ये भाष्य केले आहे. अधिवेशनापूर्वी मोठे नेते एकत्र येऊन चर्चा करत असतात. त्याचप्रमाणे भारत-चीन सीमाप्रश्न, कृषी कायदे आणि नव्या सहकार मंत्रालयाबाबत चर्चा झाली असावी, असा कयास या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी बोलताना काढला. (Chandrakant Patil's commentary on Sharad Pawar-Modi meeting)

केंद्र सरकारने नुकतेच निर्माण केलेले सहकार मंत्रालय व कायद्याची माहिती पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडून घेतली असावी. गेल्या वर्षी करण्यात आलेले कृषी कायदे आणि त्याच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन, तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण आणि त्यासंदर्भातील इम्पारिकल डाटा यांसदर्भात चर्चा झाली असावी, अशी शक्यता चंद्रकांत पाटील यांनी नाशिकात बोलताना व्यक्त केली. 

पाटील म्हणाले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षाचे नेते विविध मंत्री तसेच पंतप्रधानांना भेटून त्यांच्या मतदारसंघाच्या प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करत असतात. त्यामुळे पवार आणि मोदी यांच्यात आज दिल्लीत झालेली भेटी नार्मल भेट आहे, असे माझे मत आहे. पण तरीही काही घडले असेल तर मला त्याबाबतची माहिती नाही.

महाराष्ट्रात विविध राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता कमी आहे. कारण, महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. हे एकत्र राहिले नाही तर त्यांची स्थिती फार वाईट होईल आणि हे या तीनही पक्षांना माहिती आहे, त्यामुळेच ते तिघे एकत्र आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी राजकीय घडामोड वैगेरे काही होईल, असे मला वाटत नाही, असेही चंद्रकांतदादांनी या वेळी बोलताना नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com