Breaking - छगन भुजबळांना कोरोनाची लागण - Chagan Bhujbal Found Corona Positive | Politics Marathi News - Sarkarnama

Breaking - छगन भुजबळांना कोरोनाची लागण

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धास्तावले आहेत. त्यामुळे पक्षाने पुढील दोन आठवडे जनता दरबार हा उपक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पक्षाने केले आहे. आता छगन भुजबळही कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. 

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे भुजबळ यांनी कळवले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धास्तावले आहेत. त्यामुळे पक्षाने पुढील दोन आठवडे जनता दरबार हा उपक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पक्षाने केले आहे. आता छगन भुजबळही कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. 

राज्यात कोरोना संसर्ग वाढत चालल्याने राज्य शासनाची चिंताही वाढू लागली आहे. त्यातच सध्या चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबईतील घरातील दोघांना कोरोना झाल्याने ते विलगीकरणात आहेत. काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामुक्त झाले आहेत.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख