भाजपातील नाराजीमुळेच राज्यात कार्यकर्त्यांचे राजीनामे ;एकनाथ खडसे - BJP Wokers will opt out from party Claims Ekanath Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपातील नाराजीमुळेच राज्यात कार्यकर्त्यांचे राजीनामे ;एकनाथ खडसे

कैलास शिंदे
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळेच आता कार्यकर्ते राजीनामे देत आहेत, असे परखड मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. जळगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

जळगाव ; भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळेच आता कार्यकर्ते राजीनामे देत आहेत, असे परखड मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. जळगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेलेले एकनाथराव खडसे यांच्या गाडीला काल (ता. १) रोजी अपघात झाला होता. अमळनेर येथून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून खडसे जळगावकडे निघाले होते. धरणगाव नजिक त्यांच्या कारचे टायर फुटले चालकाने प्रसंगावधान राखल्याने खडसे अपघातातून बचावले. त्याची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आज जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.तसेच अनेकांनी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले, ''महाराष्ट्रात अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. त्यांची ही सुरवात म्हणजे पक्षातील नाराजीचा परिणाम आहे. पक्षात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज आहेत.हळूहळू त्याचा परिणाम दिसून येत असून अजून अनेक राजीनामा देतील असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विधानपरिषदेसाठी त्यांची कन्या ॲड. रोहिणी खडसे यांचे नाव चर्चेत असल्याबाबत पत्रकारांनी विचालेल्या प्रश्‍नाला मात्र त्यांनी काहीही उत्तर दिले नाही.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख