खडसेंमुळे नंदूरबार राष्ट्रवादीमय होणार : भाजप माजी आमदार पाडवींचा दावा (व्हिडिओ)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज जळगावात दाखल झाले. त्यांच्या मुक्ताई निवासस्थानीतळोदा येथील माजी आमदार उदेसिंग पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांसोबत खडसेंच्या भेटीला गेले होते. नंदुरबार जिल्ह्यातील काही घडमोडींवर यावेळी चर्चा झाली.
BJP Ex Mla Udesing Padvi Met Ekanath Khadse At Jalgaon
BJP Ex Mla Udesing Padvi Met Ekanath Khadse At Jalgaon

जळगाव : नंदूरबारचे एकनाथ खडसेंवर मोठे प्रेम आहे. आमच्या दोन नगरपालिका आहेत तळोजा, शहादा. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर तेथील नगरसेवक, नगराध्यक्ष राष्ट्रवादीत येतील. त्याचबरोबर नंदूरबार नगरपालिका आहे. धडगाव नगरपंचायत आहे. तिथेही राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिल. एकूण संपूर्ण नंदूरबार जिल्हाच राष्ट्रवादी होण्याची शक्यता आहे, असा दावा भाजपचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज जळगावात दाखल झाले. त्यांच्या मुक्ताई निवासस्थानी तळोदा येथील माजी आमदार उदेसिंग पाडवी हे नंदुरबार जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांसोबत खडसेंच्या भेटीला गेले होते. नंदुरबार जिल्ह्यातील काही घडमोडींवर यावेळी चर्चा झाली. मोजके कार्यकर्ते देखील बैठकीला उपस्थित होते. नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खडसेंनी यावेळी पाडवी यांना दुसऱ्या खोलीत बोलावून त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली.

या भेटीबाबत पाडवी म्हणाले, "नाथाभाऊ राष्ट्रवादीत गेल्यानंतर नंदूरबार जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांच्या स्वागताला आलो. आपले पाठीराखे म्हणून नाथाभाऊ आले आहेत, त्यामुळे त्यांची भेट घ्यावी, असे कार्यकर्त्यांना वाटले. आम्ही आजच्या भेटीत संघटनात्मक चर्चा केली. निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी करा. मग कुठले मतदारसंघ लढवायचे ते ठरवू, असे खडसे यांनी आपणाला सांगितले,"

आगामी काळात अनेक मोठी नांवे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील असा दावा त्यांनी यावेळी केला. ''राष्ट्रवादीत येऊ इच्छिणाऱ्यांची फार मोठी नावे आहेत. पण आज ती सांगता येणार नाहीत. जिल्हाच्या भेटीला नाथाभाऊ येतील त्यावेळी काही प्रवेश होतील. यादी मोठी आहेत. मात्र, आम्हाला निष्ठावान कार्यकर्ते हवेत. आयाराम गयाराम नकोत," असे ते म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com