भाजप नगरसेवक शशिकांत जाधव राष्ट्रवादीच्या वाटेवर?

भारतीय जनता पक्षाचे सातपूर येथील नगरसेवक शशिकांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. फ्लॉवर शोच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याला निमंत्रित न करता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन केल्याने ते चर्चेला निमित्त ठरले आहे.
shashikant jadhav
shashikant jadhav

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे सातपूर येथील नगरसेवक शशिकांत जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. फ्लॉवर शोच्या उद्‌घाटनाच्या निमित्ताने भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याला निमंत्रित न करता पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत उद्‌घाटन केल्याने ते चर्चेला निमित्त ठरले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक पक्षविस्तार कोरोनामुळे संथ झाला होता. मात्र आता पुन्हा त्याला गती आली आहे. यादृष्टीने भारतीय जनता पक्षातील नाराज नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने भाजपच्या नेत्यांची झोप उडाली आहे. सद्यस्थितीत दहा ते बारा नगरसेवक पक्षांतराच्या मनस्थितीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.   

महापालिकेच्या २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या माध्यमातून शशिकांत जाधव यांनी सत्तेच्या राजकारणात प्रवेश केला. मनसेकडून सलग दोन पंचवार्षिकमध्ये ते निवडून आले. २०१२ मध्ये महापालिकेत मनसेची सत्ता आल्यानंतर महापौरपदाची संधी हुकली. त्यानंतर त्यांना सभागृह नेतेपद देण्यात आले. परंतु काही कालावधीनंतर पद काढून घेण्यात आले. मनसेच्या सत्ता काळात दुसऱ्या टर्ममध्ये देखील महापौरपदाची संधी हुकली. स्थायी समितीवरही संधी न मिळाल्याने पक्षात अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाल्याने त्यांनी २०१७ पूर्वी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. 

सध्या जाधव हे भाजपचे नगरसेवक आहेत. भाजपच्या सत्ता काळातही त्यांना स्थायी समिती सदस्य वगळता मोठे पद मिळाले नाही. पंचवार्षिकमधील शेवटचे वर्ष असल्याने स्थायी समिती सभापतिपद मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु तेथेही संधी मिळाली नाही. त्यामुळे नाराज जाधव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. जानेवारीत फ्लॉवर शोचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते केले. त्या वेळी भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याला त्यांनी निमंत्रित न केल्याने त्याचवेळी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. स्थायी समितीत त्यांना स्थान मिळाल्याने आता अधिक जोरात राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.
...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com