भुसावळमध्ये भाजपला झटका : आंदोलनाला आमदार सावकारे, नगराध्यक्षांची दांडी 

भुसावळमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
BJP blow in Bhusawal : MLA savkare, mayors absent in  agitation
BJP blow in Bhusawal : MLA savkare, mayors absent in agitation

भुसावळ : लॉकडउन काळात जनतेला देण्यात आलेले भरमसाठ विजबिल माफ करावे, यासाठी भाजपतर्फे आज (ता. 23 नोव्हेंबर) भुसावळ शहरात आंदोलन करण्यात आले. मात्र, यात भाजपचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे तसेच खडसे समर्थक नगरसेवकांची गैरहजेरी होती. त्यामुळे आता भुसावळात राजकीय चर्चा सुरू झाली आहे. खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रसमध्ये प्रवेश केल्यानंतर भुसावळ भाजपमध्ये फूट फटल्याचे दिसून येत आहे. 

वाढीव वीजबिलाच्या निषेधार्थ भाजपतर्फे आज राज्यभरात आंदोलन करण्यात आले. भुसावळ येथेही आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयाजवळ विजबिल होळी करण्याचे आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार संजय सावकारे, भाजपचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक नगरसेवक अनुपस्थित होते. त्यामुळे आता भुसावळमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्टवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भुसावळ भारतीय जनता पक्षात फुट पडल्याचे दिसून आले आहे. भारतीय जनता पक्षाची शहराची बैठक किंवा कोणताही उपक्रम असो खडसे यांचे समर्थक नगरसेवक अनुपस्थितीत असतात. आजही खडसे समर्थक नगरसेवकांची अनुपस्थिती होती. 

आमदार सावकारे नाशिकला 

भुसावळ विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे संजय सावकारे आमदार आहेत. आजच्या आंदोलनात त्यांचीही अनुपस्थिती होती. याबाबत माहिती घेतली असता ते नाशिक येथे गेल्याचे सांगण्यात आले. 

आंदोलनात फक्त कार्यकर्ते; नेते गायब 

आंदोलनात भाजप भुसावळ शहर सरचिटणीस पवन बुंदेल, अमोल महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र आवटे, राजु नाटकर, पिंटु कोठारी, किरण कोलते, निक्की बतरा, परिक्षीत बऱ्हाटे, गिरीष महाजन, ऍड. बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी, खुशाल जोशी, प्रवीण इखणकर, सुनील महाजन, नरेंद्र पाटील, नागो पाटील, बिसन गोहर, राजु खरारे, शाम माहुरकर, अनिरुद्ध कुलकर्णी, देवेश कुलकर्णी, नंदकिशोर बडगुजर, प्रा.प्रशांत पाटील, अमित असोदेकर, दिनेश दुधानी, शेखर इंगळे, चेतन बोरोले, रमाशंकर दुबे, राहुल तायडे, लोकेश जोशी, केतन पाटील, राजू चव्हाण, निखिल वायकोळे, अविनाश बर्हाटे, नरेंद्र बऱ्हाटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com