मग तुमचा आमदार गिरीश मेला का? खडसेंची ऑडिओ क्लिप व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीष महाजन यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 Girish Mahajan, Eknath Khadse 3.jpg
Girish Mahajan, Eknath Khadse 3.jpg

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीष महाजन यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार खडसे यांना करताना ऐकू येत आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी मग तुमचा आमदार गिरीश (भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन ) मेला का?, असे वक्तव्य केले, असल्याचे समोर आले आहे.

याशिवाय, खडसे यांनी महाजन यांच्याविषयी अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्कही साधला. तेव्हा एकनाथ खडसे यांनी तो आवाज माझाच असल्याची कबुली दिली असल्याचे समजते. खानदेशी भाषेत आपण अमका तमका मेला का? 'असे सहज म्हणून जातो. ही बोलीभाषा आहे. त्यामुळे यामध्ये काही विशेष नाही, असे खडसे यांनी म्हटले आहे. 

ऑडिओ क्लीप मध्ये खडसे काय म्हणाले आहेत?

जामनेरच्या वाकोदजवळ असलेल्या वडगाव बुद्रूक गावातील एका नागरिकाने खडसे यांना फोन केला होता. त्या नागरिकाने आपल्या गावात पाणी नसल्याची समस्या मांडली. त्यावर खडसे यांनी तुमचा आमदार गिरीश इकडे-तिकडे बायकांच्यामागे फिरतोय का, असे म्हटले आहे.
त्यावर त्या व्यक्तीने गिरीश महाजन आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तेव्हा खडसे यांनी, तो (गिरीश महाजन) फक्त पोरींचेच फोन उचलतो, असे म्हटले. तसेच आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून गिरीश महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, असेही खडसे म्हणाले आहेत. 

गिरीश महाजन काय म्हणाले? 

ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर याविषयी महाजन यांना विचारले असता ते म्हणाले की ''यामध्ये एकनाथ खडसे यांचा दोष नाही. वाढते वय, अनेक आजार यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन सुद्धा त्यांना आमदारकी मिळाली नाही. त्यांच्या मुलीलाही लोकांनी नाकारले. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com