फडणवीसांसमोर शकुनीमामाही फिका पडेल : अनिल गोटेंचा पत्रक हल्ला

मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासह अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या पाठीत खुपसण्यासाठी एकही खंजीर बाजारात शिल्लक ठेवला नाही. त्यामुळेच ते खंजीराची भाषा करतात असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
Anil Gote Verbally Attacks Ex CM Devendra Fadanavis
Anil Gote Verbally Attacks Ex CM Devendra Fadanavis

जळगाव : मुख्यमंत्रीपदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासह अनेकांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या पाठीत खुपसण्यासाठी एकही खंजीर बाजारात शिल्लक ठेवला नाही. त्यामुळेच ते खंजीराची भाषा करतात असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

गोटे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून हल्ले सुरू केले आहेत. त्याच अंतर्गत आजही प्रसिध्दी पत्रक काढून त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे. त्यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार पडळकर यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. फडणवीसाबाबत ते म्हणतात, ''खोटे बोलण्याचे एकत्रित रूप म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. प्रारंभीची अडीच वर्षे ते माझ्या बाजूने होते. पण हे इतके कारस्थानी आहेत, की शकुनीमामाही त्यांच्या समोर फिका पडेल.''

खडसेंविरुद्ध कारस्थान
गोटे म्हणाले, "नाथाभाऊ खडसें विरूध्द फडणवीस यांनीच कारस्थान रचले. नाथाभाऊ दाऊदच्या बायकोशी फोनवर बोलतात इथपासून सुरू झालेले आरोप त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचविले. नाथाभाऊंची चुक एवढीच होती की त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. खानदेशातील मुख्यमंत्री व्हावा म्हणून आम्हीही त्यांचे समर्थक होतो,''

फडणवीसांनी खंजीर खुपसले
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षाच्या काळात केवळ खंजीर खुपसले असा आरोप करून गोटे म्हणतात, 'धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दलची माझी मते जगजाहीर आहेत. आज पर्यंत कुठल्याही राजकर्त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळून नये, असा बंदोबस्त केला नव्हता. तो देवेंद्र फडणवीसांनी केला. टाटा इन्स्टीटयूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेकडून सर्वेक्षण करून घेवून गोड बोलून पाच वर्षे झुलवत ठेवले. अखेर त्यांनी धनगरांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यानीं अनेकांच्या पाठीत इतके खंजीर खुपसले की बाजारात खंजीरच शिल्लक राहिला नाही,''

मुंडे घराण्याला सोडले नाही
''नानाभाऊ कोकरे, अण्णासाहेब डांगे, प्रकाश शेंडगे माझ्यासकट सर्वजण भाजपच्या जातीयवादाचे बळी ठरले आहेत. असा आरोप करून ते म्हणतात, ''मोतीरामजी लहाने, नानासाहेब उत्तमराव पाटील या नेत्यांचे नामोनिशानही शिल्लक ठेवले नाही. पडळकरांना आमदारकीचा उपभोग घेण्याआधीच नशा चढली आहे. भारतीय जनता पक्षातील उच्च वर्णीयांच्या सकुचितपणाची अजून पुसटशी ओळखसुध्दा झालेली नाही. ते आनंद उपभोगत आहेत. नव्या नवरीचा आनंद घेत आहेत. रूळल्यावर झटके बसतील,'' ज्यांनी पक्ष वाढविण्यासाठी आपल्या जीवाची पराकाष्टा केली त्या (कै.)गोपीनाथ मुंडे यांच्या कुंटुंबातील कोणीही राजकारणात राहू नये, असे कारस्थान फडणवीस यांनी केले असा आरोपही त्यांनी केला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com