पहिला निकाल भाजपच्या बाजूने..अमरीश पटेल विजयी (व्हिडिओ) - Amrish Patel  has won the Dhule-Nandurbar by-election of the Legislative Council. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, उद्धव ठाकरे आज एकाच व्यासपीठावर

पहिला निकाल भाजपच्या बाजूने..अमरीश पटेल विजयी (व्हिडिओ)

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

विधानपरिषदेच्या धुळे -नंदुरबार पोटनिवडणुकीत  काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल हे विजयी झाले आहेत.

धुळे : विधानपरिषदेच्या धुळे -नंदुरबार पोटनिवडणुकीत  काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल हे विजयी झाले आहेत. येत्या काही तासात अधिकृत निकाल स्पष्ट होणार आहे. विधानपरिषदेच्या धुळे -नंदुरबार पोटनिवडणुकीसाठी 99 टक्के मतदान झाले आहे. 

माझ्या सगळ्या मतदारांनी मला मनापासून मदत केली. आमच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मनापासून मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे, अशी प्रतिक्रिया अमरीश पटेल यांनी व्यक्त केली. 

धुळे-नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचं संख्याबळ पाहता भाजपचं पारडं जड असल्यानं भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजपाच्या गोटातून व्यक्त करण्यात आला आहे. भाजपमध्ये आलेल्या अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. 

सध्या भाजप मध्ये उमेदवारी करत असलेले अमरीश भाई पटेल यांनी काँग्रेस मधून गेल्यावर्षी विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य असताना भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यामुळे अमरिशभाई पटेल यांना विधान परिषदेचे सदस्यत्व पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि त्यामुळेच ही पोट निवडणूक घेण्यात आली आहे
 
आसगावकरांचे समर्थक विजयाच्या जयघोषात मतदान केंद्रावर दाखल
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान झाले. दरम्यान आज मतमोजणीसाठी जाण्याआधी म्हणजे सकाळी तांबडं फुटायलाच (सूर्योदयलाच) शिक्षक मतदार संघातील उमेदवार जयंत आसगावकर (कोल्हापूर) यांच्यासोबत समर्थकांनी गुलाल लावून विजय उत्सव साजरा करूनच मतमोजणी केंद्रावर  दाखल झाले. 

पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल येथे मतमोजणी होत आहे. शिक्षक मतदार संघासाठी 42 टेबलावर मतमोजणी होईल. प्रत्येक फेरीत तेराशे मते मोजले जातील. मतमोजणीचा अधिकृत निकाल ४ डिसेंबरला पहाटे जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी शिक्षक मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर (कोल्हापूर) यांनी आज सकाळी मतमोजणी केंद्रात जाण्याआधीच त्यांच्या समर्थकांनी एकमेकांना गुलाल लावत तासगावकर यांचा जयघोष केला. 

रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती आणि कसे मतदान झाले, याची गोळाबेरीज करणारे समर्थक आज पहाटे ही लवकर उठले. दरम्यान गेल्या महिनाभर सुरू असलेला प्रचाराचा धडाका. त्याला मिळणारा चांगला प्रतिसाद यामुळे आसगावकऱ्यांच्या समर्थकांना विजयाची खात्री वाटू लागली आहे. त्यामुळेच त्यांनी आज सुर्योदयालाच जयंत आसगावकर यांच्या जयघोष करत विजय उत्सव साजरा केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख