नाशकात 24 रुग्ण हकनाक तडफडून दगावले...महापौर सतीष कुलकर्णी काय करीत होते? 

बुधवारचा दिवस नाशिकशहरासाठी काळा दिवसच म्हणावा लागेल. महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्‍सीजन टाकीच्या दुर्घटनेत चोविस कोरोनाबाधीतांचे प्राण गेले. यात पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांपासून सगळे हळहळले. मात्र या शहराचे पालक, प्रथम नागरिक असलेले महापौर सतीश कुलकर्णी यांची यात काहीच जबाबदारी नाही का?ते आहेत कुठे,असा प्रश्‍न या निमित्ताने विचारला जात आहे.
Mayor Zakir
Mayor Zakir

नाशिक : बुधवारचा दिवस शहरासाठी काळा दिवसच म्हणावा लागेल. महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्‍सीजन टाकीच्या दुर्घटनेत चोविस कोरोनाबाधीतांचे प्राण गेले. यात पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांपासून सगळे हळहळले. मात्र या शहराचे पालक, प्रथम नागरिक असलेले महापौर सतीश कुलकर्णी यांची यात काहीच जबाबदारी नाही का? ते आहेत कुठे असा प्रश्‍न या रुग्णालयातील एका रुग्णाने विचारला.

गेल्या वर्षभरातील या महापौरांचे वर्तन एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यापुढे आले. खरच महापौर कुलकर्णी यांनी एव्हढी गंभीर कोरोनाची लाट आली त्यात त्यांनी काय केले? ते होते कुठे? हे प्रत्येक नाशिककर त्यांना निश्‍चित विचारेल. 

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात काल दुपारी साडे बाराला ऑक्‍सिजनच्या टाकीच्या कॉकला तडे गेले. त्याने ऑक्‍सिजन रिफीलींग करताना गळती झाली. त्यात रुग्णालयाचा ऑक्‍सिजनचा पुरवठा दिड तास बंद पडला. त्यात चोवीस रुग्णांचे प्राण गेले. याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांसह विविध नेत्यांनी भेट देऊन पाहणी केली. 

यात भाजपचे प्रविण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रीया अतिशय उद्‌बोधक होत्या. ते म्हणाले, या प्रकरणात निष्काळजीपणा झाला. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. ते योग्य बोलले, मात्र मग गुन्हे कोणावर दाखल करणार?. महापालिकेत तर शंभर टक्के भाजपची सत्ता आहे. त्यांच्या परवानगीशिवाय इथे पानही हालत नाही. याचाच गांभिर्याने व राजकारण विरहीत विचार झाला पाहिजे. महापौरांनी घटना घडल्यानंतर पाच लाख रुपये सानुग्रह अनुदानाच्या घोषणेपलिकडे काय केले?

वस्तुतः याविषय अनेक प्रमाद आहेत. मात्र जर ड्युरा टॅंक येण्याच्या आधीच ऑक्‍सिजन टाकीचा कॉक नादुरुस्तु होता, असे प्रशासनाचे म्हणने ग्राह्य धरले, तर एक गंभीर प्रश्‍न पडतो. कोरोनाचा प्रसार होणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर. येथे महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे 66 नगरसेवक असून सर्व पदांवर ते विराजमान आहेत. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सर्व सभापती आणि बरेच काही. तर जेव्हा कोरोना पसरत होता तेव्हा ही मंडळी किमान आपल्या प्रभागात तरी काही प्रतिबंध करत होती काय? झाकीर हुसेन रुग्णालयाच्या दुरावस्थेविषयी गेले महिनाभर सतत बातम्या, सोशल मीडियावर पोस्ट येत होत्या. अगदी पोर्चमध्ये खुर्चीवर बसवून रुग्णांना ऑक्‍सिजन दिला जात होता. त्यावर महापौरांनी काय केले?. 

कोविड सेंटर उभारणे शक्‍य होते...

महापौर झाकीर हुसेन रुग्णालयात किती वेळा गेले. देशातील सर्वाधिक वेगवान संसर्ग होऊन नाशिक शहर पहिल्या क्रमांकावर पोहोचले. वस्तुतः आज शहरात आज शासकीय आकडेवारीनुसार तीन हजार 736 रुग्ण उपचार घेत आहेत. ही संख्या खूप मोठी आहे. अधिकृत संख्येच्या खुप जास्त रुग्ण घरीच उपचार घेत असावेत, असा अंदाज आहे. रुग्णांना बेड नाही. ऑक्‍सीजन नाही. वैद्यकीय सुविधा नाही. ही जबाबदारी पूर्णतः स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिकेची आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, समता परिषद, शिवसेना, क्रेडाई, सातपूरला सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येऊन कोविड सेंटर सुरु करीत आहेत. मग महापालिका म्हणून महापौरांना शहराच्या सर्व सहा विभागांत कोविड सेंटर उभारणे शक्‍य होते. त्याबाबत त्यांनी काय केले?. त्यासाठी भूतकाळात डोवाले तर चित्र रंजक आहे. 

महापौरांचे अवैज्ञानिक सल्ले

स्मरणशक्तीला ताण दिला, तर लक्षात येईल की, गेल्या वर्षी कोरोनाची लाट आली तेव्हा महापौरांनी कोरोनाच्या साहित्याच्या खरेदीचा प्रस्तावच महिनाभर रोखून धरला होता. कोरोनासारखा जीवघेणा आजार पसरत असताना असे कोणी करु शकते का?. महापालिकेशी संबंधीत विषयांवर पालकमंत्र्यांकडे होणाऱ्या बैठकांना ही मंडळी फिरकतच नव्हती. त्यामुळे राज्य शासनाशी त्यांनी समन्वय ठेवला नव्हता. कोरोनासाठी त्यांनी रामदेवबाबाची औषधे घ्यास, असा जाहीर सल्ला दिला. त्यानंतर यंदा त्यांनी प्रारंभी आत्मविश्‍वास वाढवा. त्यानंतर नाकात गरम पाणी टाका (जलनेती) हे उपचार सांगितले. त्यानंतर महापौरांनी फक्त आयुर्वेदीक उपचार घ्यावेत, अशी प्रेस नोट काढली. त्यावर खूप टीका झाल्यावर त्यांनी पुन्हा प्रेस नोट काढून तिन्ही पॅथीची औषधे घ्यावीत, असे सांगितले. एकविसाव्या शतकात एव्हढा अवैज्ञानिक प्रतिनिधी क्वचित सापडेल. झाकीर हुसेन रुग्णालय अव्यवस्थेते माहेरघर झाले होते. बिटको या रुग्णालयात कर्मचारीच नाहीत. तीथे रुग्णांची देखभाल त्यांच्या नातेवाईकांनाच करावी लागते. येथे सातत्याने भेटी दिल्या असता, किंवा येथील व्यवस्थेचा रोज आढावा घेतला असता, तर मला वाटते रुग्णांना दिलासा मिळाला असता. 

या महापौरांच्या रांगेत तुम्ही कुठे?

महापालिकेत 1992 मध्ये (कै) शांतारामबापू वावरे पहिले महापौर झाले. तेव्हा शहरात तीव्र पाणी टंचाई होती. त्यावेळी श्री वावरे शहराच्या गल्लीबोळत फिरून स्थानिक नगरससेवकाला बरोबर घेऊन नागरिकांना दिलासा देत. त्यांनी गल्लो-गल्ली कुपनलिका खोदल्या. त्यानंत पाचव्यांदा प्रकाश मते महापौर होते. टंचाईच्या काळता ते रात्रभर विविध पाण्याच्या टाक्‍या, जलशुद्धीकरण प्रकल्पांना भेटी देत. किती पाणी आले, किती पाणी नागिरकांना मिळाले याचा हिशेब ठेवत होते. दशरथ पाटील महापौर असतांना समस्या आली की ते थेट नागिरकांच्या भेटीला जात. ऍड उत्तमराव ढिकले दर शनिवारी महापौर तुमच्या दारी हा उपक्रम करीत. बहुतांश महापौर नागरिकांत मिसळतात. याच दरम्यान सूरतला प्लेगची साथ आली. तेव्हा रात्रंदिवस शहरात फिरून हे शहर लख्ख करण्यात महापौर व तत्कालीन आयुक्त कृष्णकांत भोगे यांचा मोठा वाटा होता.  सध्याच्या महापौरांनी यातील पाच टक्के काम केले असते तर शहराने त्यांचे आभार मानले असते. मात्र तसे झालेले दिसले नाही, हीच खंत 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com