`राष्ट्रवादी`'च्या स्थापना दिनानिमित्ताने 'या' नेत्याने केले शालेय शुल्क निम्मे

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त चार महिन्यांचे निम्मे शालेय शुल्क माफ केले आहे. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थी व पालकांना आगामी शालेय सत्रातील अडचणींतून मार्ग सापडेल असा विश्‍वासराष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रतन चावला यांनी व्यक्त केला
Nashik NCP Leader Ratan Chawka Reduced School Fees on NCP Anniversary
Nashik NCP Leader Ratan Chawka Reduced School Fees on NCP Anniversary

नाशिक : कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे विद्यार्थ्यांपुढे अडचणी आहेत. त्याचा विचार करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रतन चावला यांनी या सर्वांन दिलासा दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त चार महिन्यांचे निम्मे शालेय शुल्क माफ केले आहे. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थी व पालकांना आगामी शालेय सत्रातील अडचणींतून मार्ग सापडेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

देवळाली कॅम्प येथील डॉ. गुजर सुभाष हायस्कूलच्या विद्यार्थी व पालकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. श्री. चावला या संस्थेचे सचिव आहेत. ते म्हणाले, "कोरोना'चा सर्व क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्यातून अनेकांचे रोजगार गेले. व्यापार, व्यवसाय थंडावले आहे. कार्यालये बंद आहेत. त्याचा सर्वांना आर्थिक स्वरुपात फटका बसला आहे. त्याचा सर्वांनी विचार करुन सामाजिक दृष्टिकोणातून या प्रश्‍नाकडे पाहिले पाहिजे. त्यामुळेच आम्ही आमच्या संस्थेच्या शिक्षकांचे जानेवारी ते मार्च या महिन्यांचे पूर्ण वेतन अदा केले आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांचे पंच्च्याहत्तर टक्के वेतन दिले आहे. आगामी काळात त्यांचे उर्वरीत वेतनदेखील समायोजित करण्यात येईल,"

विद्यार्थ्यांचे हित पाहून निर्णय

श्री. चावला पुढे म्हणाले, ''या कालावधीत पालकांनाही अडचणी आहेत. त्यामुळे शालेय शुल्कात पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे. ज्या पालकांनी ऑनलाईन फी भरली असेल त्यांना देखील पुढील काळात त्यांची जादा शुल्क समायोजित करु. हे करतांना आम्ही सामाजित हेतू डोळ्यापुढे ठेवला आहे. श्रीमंत पालकांची मुले मोठ्या शाळांत शिक्षण घेतात. त्यांना काही फरक पडणार नाही. मात्र सामान्य वर्गातील व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी आहेत. यातील एक विद्यार्थीसुद्धा आर्थिक कारणाने शैक्षणीक प्रवाहापासून लांब जाऊ नये, हा आमचा हेतू आहे."

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्यात सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होतील, अशी माहिती चावला यांनी दिली. ते म्हणाले, ''कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरीक, तसेच झोपडपट्टी विभागाक डाऊन कोरोनाविषयी जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी सकाळपासून पदाधिकारी व कार्यकर्ते काम करीत आहेत. आगामी काळात कोरोनाला पराभूत करायचे असेल तर त्याविषयी सामान्य नागरीकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यावर भर द्यावा लागेल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com