रेशनकार्ड नसलेल्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष करणार सुमारे सत्तर टन धान्यवाटप

नाशिक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांसाठी सुमारे सत्तर टन अन्न- धान्याचे वाटप करण्यात येत आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी पाहणी करुन उपक्रमाचा प्रारंभ केला.
Nashik NCP Distributed Seventy Tonnes of Food grains to Needy People
Nashik NCP Distributed Seventy Tonnes of Food grains to Needy People

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरीही आपण सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्‍यकता आहे. त्यादृष्टीने नाशिक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांसाठी सुमारे सत्तर टन अन्न- धान्याचे वाटप करण्यात येत आहे. आज पक्षाच्या कार्यालयात त्याची पाकीटे करण्यात आली. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी पाहणी करुन उपक्रमाचा प्रारंभ केला. 

यावेळी भुजबळ म्हणाले, ''राज्य शासनाने सध्याच्या अडचणीच्या काळात कोणीही गरजू व गरीब नागरीक उपाशी राहणार नाही यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यासाठी मोफत पाच किलो धान्य यांपासून तर गहू, तांदूळ हे धान्य स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही. त्यांचा देखील विचार केला. त्यातून हे धान्य वाटप होत आहे,''  

नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय नाशिक येथे टन डाळ व तांदूळ करण्यात येत असून पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचे पॅकिंग करण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया आज पूर्ण झाल्यानंतर आज पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते हे अन्नधान्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या विभागीय अध्यक्षांच्या ताब्यात देण्यात आले असून रेशन कार्ड नसलेल्या नागरिकांना या अन्न धान्याचा लाभ देण्यात येणार आहे.

प्रत्येक विभागीय अध्यक्षांकडे प्रत्येक विभागात डाळ व तांदळाचा साठा देण्यात आला असून रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांना प्रत्येकी किलो डाळ, तांदुळ किलो अशा स्वरूपात वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगीतले. 

पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन नाशिक येथे विभागीय अध्यक्षांकडे अन्न, धान्याचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश पदाधिकारी नाना महाले शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार, दिलीप खैरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, निवृत्ती अरिंगळे अंबादास खैरे, समाधान जाधव, संजय खैरनार, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, आबा मौले, शंकर मोकळ, मनोहर कोरडे, मुजाहिद शेख, जीवन रायते, नाना सोमवंशी, नाना पवार, महेश भामरे, रविंद्र शिंदे, अनिल परदेशी, भालचंद्र भुजबळ आदी उपस्थित होते. 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com