रशीद शेख यांनी सुभाष भामरेंना फटकारले! म्हणाले नाशिक-धुळ्याच्या रुग्णांचे मालेगावात स्वागतच!

भाजपचे नेते म्हणतात, मालेगावचे रुग्ण धुळे आणि नाशिकला नको. आम्ही मात्र असे असंवेदनशील नाही. आता मालेगावची स्थिती नियंत्रणात आली आहे. धुळे, नाशिकचे रुग्ण उपचारासाठी मालेगावला आले, तर आम्ही मात्र त्यांचे स्वागत करु. त्यांना चागंले उपचार व्हावेत, त्यांनी सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करु, असे काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांनी येथे सांगितले
EX Congress MLA Rashid Shaikh took Subhash Bhamre Head On
EX Congress MLA Rashid Shaikh took Subhash Bhamre Head On

मालेगाव  : ''आपल्या मतदारसंघात समस्या निर्माण झाली तर तिथे भेट देऊन त्याचे निराकरण करणे, पिडीतांना भेटणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते. खासदार डॉ. सुभाष भामरे कोरोनामध्ये मालेगावला फिरकलेही नाही. उलट त्यांनी मालेगावचे रुग्णच नको अशी भूमिका घेतली. अशा व्यक्तीला काय बोलावे. त्यांनी मालेगावची माफीच मागीतली पाहिजे. दुसरा पर्याय नाही,'' या शब्दांत कॉंग्रेसचे नेते, माजी आमदार रशीद शेख यांनी खासदार भामरे यांना फटकारले आहे. 

खासदार डॉ. भामरे यांनी कोरोनाचा प्रसार वाढत असतांना, मालेगावचे रुग्ण धुळ्याला नको अशी भूमिका घेतली होती. त्यावर टिका झाल्यावर त्यांनी मालेगाव बाह्य चालेल मात्र मालेगाव मध्य नको, असे सांगून सारवासारव केली होती. दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथील विश्रामगृहात मालेगाव महापालिकेच्या कोरोनात्या मदतकाऱ्याविषयी झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार डॉ. भामरे यांनी सहभागी होण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा महापौर ताहेरा शेख, माजी आमदार शेख यांनी पत्रकार परिषदेत सहभागी न होता, खासदार भामरेंचा निषेध केला होता.

यावेळी खासदार भामरेंना रशीद शेख यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ''भाजपचे नेते म्हणतात, मालेगावचे रुग्ण धुळे आणि नाशिकला नको. आम्ही मात्र असे असंवेदनशील नाही. आता मालेगावची स्थिती नियंत्रणात आली आहे. धुळे, नाशिकचे रुग्ण उपचारासाठी मालेगावला आले, तर आम्ही मात्र त्यांचे स्वागत करु. त्यांना चागंले उपचार व्हावेत, त्यांनी सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करु."

भामरेंची भूमीका अमानवी

ते पुढे म्हणाले, हे भामरे असे वागतात, हे पाहून दुःख होते. एखादा माणूस एव्हढ्या खालच्या थराला देखील जाऊ शकतात का? हा प्रश्‍न पडतो. सामान्य नागरिक डॉक्‍टरला देव मानतात. मात्र, केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषविलेले, खासदार असलेले डॉ. सुभाष भामरे उच्चशिक्षित डॉक्‍टर आहेत. असे असूनही त्यांची कोरोनाबाधित रुग्णांबद्दलची भूमिका किती अमानवी आहे. डॉक्‍टरांनी प्रारंभी मालेगावचे रुग्ण नको, असे वक्तव्य केले, ते अंगलट येईल, असे जाणवताच त्यांनी मालेगाव मध्यचे रुग्ण नको, अशी पलटी मारली. त्यांनी मोठी चुक केली आहे. त्याचे समर्थन शक्‍यच नाही,"

भामरेंचा निषेध करणारच

शेख पुढे म्हणाले, "ही चुक झाकण्यासाठी. ते आम्ही काय केले? पन्नास वर्षात काय काम केले? असे विचारत आहेत. आम्ही काय केले, कोणती कामे केली, ते सर्व जनतेला माहिती आहे. ते सांगण्याची गरज नाही. डॉ. भामरे स्वतः केंद्रीय मंत्री असूनही निष्क्रिय ठरलेत. त्यांनी आम्हाला कामाचा जाब विचारू नये. त्यांनी मालेगाव शहर व तालुक्‍यातील मतदारांची जाहीर माफी मागावी व कामाचा लेखाजोखा द्यावा. ते जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत आपण वेळोवेळी त्यांचा निषेध करत राहू."
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com