कोरोना नियंत्रणासाठी कृषिमंत्री दादा भुसेंनी सुचवला 'हा' अफलातून पर्याय

नाशिकमध्ये कोरोना नियंत्रणात हवा असेल, तर फक्त महापालिकेच्या यंत्रणेवर विसंबून राहू नका. सर्व पॅथीच्या डॉक्‍टरांना मैदानात उतरवा. फॅमिली डॉक्‍टर म्हणून त्यांच्याकडून तपासण्या करा, असा उपाय कृषिमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या प्रशासनाला सुचवला आहे
Take Help of All Fields doctors to curb Corona in Nashik suggests Dada Bhuse
Take Help of All Fields doctors to curb Corona in Nashik suggests Dada Bhuse

नाशिक : मालेगाव शहरात कोरोनाचा एव्हढा वेगाने संसर्ग होत होता, की राज्य सरकार हादरले होते. कृषिमंत्री दादा भुसे यांना मंदिरात जाऊन मौनव्रत धारण करावे लागले होते. मात्र आज हेच मालेगाव कोरोना नियंत्रणाचे उदाहरण बनले आहे.

नाशिकमध्ये कोरोना नियंत्रणात हवा असेल, तर फक्त महापालिकेच्या यंत्रणेवर विसंबून राहू नका. सर्व पॅथीच्या डॉक्‍टरांना मैदानात उतरवा. फॅमिली डॉक्‍टर म्हणून त्यांच्याकडून तपासण्या करा, असा उपाय कृषिमंत्री दादा भुसे यांनी नाशिकच्या प्रशासनाला सुचवला आहे. 

गेल्या आठवड्याभरात नाशिक शहरात विशेषतः मालेगाव शहर वगळता अन्यत्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.  महापालिकेची रुग्णालये कमी पडू लागली आहेत. या पार्श्‍वभूमीवर कृषिमंत्री भुसे यांनी महापालिका अधिकारी, वैद्यकीय विभागाची बैठक घेऊन त्यांना विविध सूचना केल्या. त्यासाठी त्यांनी मालेगाव पॅटर्न उलगडून सांगत त्याच पद्धतीने यंत्रणेला गती द्या. तरच नाशिक शहरात कोरोना नियंत्रणात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ''मालेगाव शहरातील अॅलोपॅथी, युनानी, आयुर्वेदिक अशा सर्व पॅथीच्या डॉक्‍टरांना आम्ही कार्यरत केले. त्यांच्यामार्फत चाचण्या घेतल्या. नागरिकांनीही फॅमिली डॉक्‍टर म्हणून त्यांच्याकडून तपासण्या करण्यास सहज तयारी दाखवली. जे घरातून बाहेर पडत नव्हते, त्यांचा प्रश्‍न सुटला. हे केल्याने कोरोनाचे वास्तव स्वरूप समोर आले. त्यानुसार उपचार पद्धती अवलंबली. परिणामी, मालेगावमधील कोरोना नियंत्रणात आला. नाशिकमध्येही हाच पॅटर्न अमलात आणावा,''

अशी आणली मालेगावमधली परिस्थिती नियंत्रणात

भुसे पुढे म्हणाले, ''मे अखेर व जूनच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एप्रिलमध्ये मालेगावमधील कोरोना परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली. रुग्ण तपासणीसाठी बाहेर पडत नसल्याने सर्व पॅथीच्या डॉक्‍टरांना कार्यरत करण्यात आले. स्थानिक डॉक्‍टरांवर नागरिकांचा विश्‍वास असल्याने त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला. सर्दी, खोकल्याचे रुग्ण गोळ्या, औषधे देऊन बरे करण्यात आले. तपासण्या वाढविल्याने मृत्युदर कमी करण्यात यश आले. लॉकडाउनचा बाऊ न करता दुकाने उघडी करण्यास परवानगी देण्यात आली. त्यातही संयम बाळगण्यात आला. रुग्णांचा वाढता आलेख लक्षात घेऊन वैद्यकीय, आरोग्य यंत्रणेने २४ तास काम केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले,''

यावेळी महापालिका आयुक्‍त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, चंद्रकांत खाडे, संतोष गायकवाड आदी उपस्थित होते. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com