आजचा वाढदिवस : सुहास कांदे (आमदार, शिवसेना)

आमदार सुहास कांदे नांदगाव (नाशिक) मतदारसंघाचे आमदार आहेत. या दुष्काळी तालुक्यात त्यांनी टॅकरने पाणीपुरवठा केला. विविध सामाजिक कामांच्या माध्यमातून ते सक्रीय आहेत.
आजचा वाढदिवस : सुहास कांदे (आमदार, शिवसेना)
Suhas kande Birthday

आमदार सुहास कांदे (Suhas Kande) नांदगाव (नाशिक) मतदारसंघाचे आमदार (Nandgaon constituncy MLA) आहेत. या दुष्काळी तालुक्यात त्यांनी टॅकरने पाणीपुरवठा केला. विविध सामाजिक कामांच्या माध्यमातून ते सक्रीय आहेत. 

अतिशय जाणीवपूर्वक नांदगाव विधानसभा मतदारसंघाची निवड करीत २००९ मध्ये सुहास कांदे यांनी या मतदारसंघात जनसंपर्क सुरु केला. काळजीपूर्वक सूक्ष्म नियोजन केले. नियोजनबद्ध कामातून उद्दिष्ट गाठता येते, याची प्रचीती आमदार कांदे यांनी दाखवून दिले. 

या  मतदारसंघातील परिवर्तनाच्या प्रयोगासाठी माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याकडे पाहिले जाते. श्री भुजबळ यांच्या विरोधात श्री. कांदे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळवली मात्र त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र श्री. कांदे यांनी भुजबळ यांचा पराभव केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाची निवडणूक जिंकली. या बॅंकेचे ते उपाध्यक्ष झाले. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत.  

नांदगाव-मनमाड येथील बाजार समित्या, पालिका अशा चढत्या क्रमाने नंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या सत्ता केंद्रावर शिवसेनेचा भगवा फडकविला. स्वाभाविकच पुढचा टप्पा म्हणजे विधानसभा निवडणुकीचा होता. अतिशय अटीतटीत त्यांनी यशश्री खेचून आणली. 


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in