आजचा वाढदिवस... दिलीप शंकरराव बनकर, आमदार निफाड - Today`s Birthday...MLA Dilip Bankar, Niphad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

आजचा वाढदिवस... दिलीप शंकरराव बनकर, आमदार निफाड

संपत देवगिरे
सोमवार, 26 जुलै 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांनी दोन वेळा निफाड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रम होत आहेत...
 

नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय, सहकारी अशी प्रतिमा असलेले दिलीप बनकर यांची सध्याची टर्म विविध कारणांनी चर्चेत आहे. विशेषतः त्यांनी रानवड सहकारी साखर कारखाना आपल्या नेतृत्वाखालील स्व. अशोकराव बनकर पतससंस्थेच्या सहकार्याने सुरु केला.

कोरोना विरोधात नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील नागरिकांसाठी कोरोनाचे रुग्णालय उभारले. सिन्नर येथील बंद असलेला ऑक्सीजन प्रकल्प सुरु केला. त्यामुळे केवळ निफाडच नव्हे तर नाशिक शहरातील ऑक्सीजनचा तुटवडा कमी करण्यात त्याचा हातभार लागला. बाजार समितीत त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोफत कोविड चाचणी सुरु केली.  

श्री. बनकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून त्यांच्या वहिनी अलका बनकर पिंपळगाव बसवंतच्या सरपंच आहेत. श्री. बनकर यांचा मूळ पिंड व्यवसायिक असा आहे. त्यांनी आपल्या कौटुंबिक भाजीपाला वाहतूकीच्या व्यवसायात चांगला जम बसविला आहे. सध्या ते राज्यातील आघाडीच्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे सभापती आहेत. स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. यानिमित्ताने त्यांनी तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय उपक्रम राबविले आहेत. भिमाशंकर शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. या संस्थेचे विविध उपक्रम सुरु आहेत.  

विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार व आपले राजकीय विरोधक अनिल कदम यांचा तिरंगी लढतीत पराभव केला. यावेळी त्यांनी मतदारसंघातील निफाड व रानवड हे दोन साखर कारखाने सुरु करणार हे मोठे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता त्यांनी केली. राज्यात पहिल्यांदाच स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेच्या आर्थिक सहभागातून रानवड सहकारी साखर भाडेतत्वावर घेऊन सुरु केला. सहकारी संस्थेकडून साखर कारखाना चालविण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने नियम दुरुस्ती करण्यात आल्याने ते शक्य झाले.  निफाड मतदारसंघ द्राक्ष, वाईन, भाजीपाला व ऊस उत्पादनासाठी ओळखला जातो. या सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. 
...    
 हेही वाचा...

अखेर `नासाका`साठी देविदास पिंगळेंचा प्रस्ताव शासनाला सादर

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख