आजचा वाढदिवस...सौ. सीमा महेश हिरे, आमदार - Birthday...Seema hire, MLA, Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

आजचा वाढदिवस...सौ. सीमा महेश हिरे, आमदार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 जून 2021

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार सौ. सीमा महेश हिरे या सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. 

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार सौ. सीमा महेश हिरे (BJP MLA Seema Mahesh hiray) या सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. 

सिडको, सातपूर औद्योगिक वसाहत आणि औद्योगिक व शासकीय कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या या मतदारसंघात आहेत. या भागाच्या विकासासाठी विविध उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.  

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत 2002 मध्ये त्यांनी गंगापूर रोड भागातील प्रभागातून त्यांनी पहिल्यांदा भारतीयजनता पक्षातर्फे उमेदवारी केली. त्यात त्या विजयी होऊन नगरसेविका झाल्या. ती त्यांची पहिलीच निवडणूक होती. त्यानंतर त्या 2007 मध्येही नगरसेविका झाल्या. 2012 मध्ये त्या सर्वाधिक मते मिळविलेल्या नगरसेविका होत्या. 

त्यांचे पती महेश हिरे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर त्यांचे सासरे पोपटराव हिरे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. त्यांनी विविध पदावंर काम केले होते. कुटुंबाचा पाठींबा आणि सामाजिक कार्याची आवड यामुळे आपली राजकीय वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे. त्यात शहराच्या विकासासाठी विविध कामे करण्याचा त्यांचा संकल्प आहे. 
...
हेही वाचा...

सलाम आजच्या हिरकणीला...9 दिवसांच्या लेकीसह पुष्पा बांबळे ग्रामपंचायत बैठकीत

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख