आजचा वाढदिवस... विधानसभा उपाध्यक्ष, नरहरी झिरवाळ

दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभेवर नरहरी झिरवाळ निवडून गेले आहेत. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचयात समिती, जिल्हा परिषद असा अगदी राजकारणातील पहिल्या पायरीपासून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे.
Narhari Zirwal
Narhari Zirwal

दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभेवर नरहरी झिरवाळ निवडून गेले आहेत. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचयात समिती, जिल्हा परिषद असा अगदी राजकारणातील पहिल्या पायरीपासून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे.

महाआघाडीत काम करताना सरकारने त्याच्या कार्यपद्धती व अनुभवामुळे त्याच्यावर विधानसभा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतरही सत्ताधारी आमदाराइतकाच आनंद विरोधकांना झाल्याचे झिरवाळ कदाचित एकमेव उदाहरण असावे. अर्थात ते का हे सर्वांनी त्या वेळी प्रसारमाध्यमातून पाहिलेच. सुरवातीच्या काळात दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांना नेतृत्व करण्याच्या संधीने तीनदा हुलकावणी दिली. कुठेही नाराज न होता पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडत पक्षाला यश मिळवून दिले. 

नंतरच्या काळात पक्षाने संधी दिल्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. एका वेळी अत्यल्प मताने पराभव झाल्यानंतर मंत्रालयातून विकासासाठी निधी मंजूर करून घेत कामे केली. केवळ मतदारसंघातीलच नव्हे, तर त्यांना राज्य, देशपातळीवरील जनतेच्या प्रश्नांची जाण आहे.

कोणतेही काम असो माझ्या हातातील नाही, असा शब्द निघाला नाही. विरोधी सरकार असतानाही विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही, असा आत्मविश्वास असणारा नेता कदाचित दुर्मिळच. एखादी व्यक्ती नुसती निवडून आली तरी त्यांच्या डोक्यात हवा घुसते. मात्र झिरवाळ आज नुसते आमदार नसून राज्याच्या सर्वोच्च पदावर असतानाही त्यांच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल नाही. अवघ्या शे-दीडशे उंबरे असलेल्या वनारेत गरीब कुटुंबातील शेतकरी, मजूर, कारकून (कामगार), व्यावसायिक ते आमदार व विधानसभा उपाध्यक्ष  असा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना इतकी मोठी मजल त्यांची राजकीय परिपक्वता सिद्ध करते. तालुक्याच्या पश्चिम भागातील घाटमाथ्यावरून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून ते पूर्व भागात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पासह बारा वळणयोजना, तीन लघुपाटबंधारे योजनांना त्यांनी मंजुरी मिळविली.
...
हेही वााच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com