तुम्हाला मुख्यमंत्री व्हावेसे वाटत नाही का?, यावर अजितदादा म्हणाले.. - Would you like to pramote as CM....Ajit pawar replied.... | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

तुम्हाला मुख्यमंत्री व्हावेसे वाटत नाही का?, यावर अजितदादा म्हणाले..

संपत देवगिरे
गुरुवार, 1 जुलै 2021

प्रत्येकाला वाटते आपली पदोन्नती व्हावी, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. तुमची पदोन्नती केव्हा होणार?, पत्रकारांच्या या प्रश्नावर हजरजबाबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क पत्रकारालाच प्रतिप्रश्न करीत, `तुम्हाला नाही का संपादक व्हावेसे वाटत?` असे विचारल्याने पत्रकारांसह उपस्थित नेत्यांतही खसखस पिकली.

नाशिक : प्रत्येकाला वाटते आपली पदोन्नती व्हावी, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. तुमची पदोन्नती केव्हा होणार?, (Won`t you like a pramotion as CM) पत्रकारांच्या या प्रश्नावर हजरजबाबी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चक्क पत्रकारालाच प्रतिप्रश्न करीत, `तुम्हाला नाही का संपादक व्हावेसे वाटत?` (Ajit pawar replied Won`t you like to be editor) असे विचारल्याने पत्रकारांसह उपस्थित नेत्यांतही खसखस पिकली.

उपमुख्यमंत्री पवार आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी कोरोनाच्या आढाव्यासह अन्य राजकीय विषयांची चर्चाही ओघाने झालीच.

यावेळी एका पत्रकाराने त्यांना, प्रत्येकासाठी पदोन्नती हा जिव्हाळ्याचा विषय असतो. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. लोकांना वाटते तुमची पदोन्नती व्हावी, तुम्ही मुख्यमंत्री व्हावे. ते केव्हा होईल. यावर उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिप्रश्न करीत, असे प्रत्येकालाच वाटते. तुम्हाला संपादक व्हावेसे वाटत नाही का ? अशी विचारणा करीत तो प्रश्न टोलवला.

यासंदर्भात ते पुढे म्हणाले, राज्यात आमचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांनी पुढील पाच वर्षांसाठी उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. आम्ही सगळे आघाडीत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यामुळे पदोन्नतीचा विषय कुणाला आवडत नाही. तुम्हाला देखील संपादक म्हणून पदोन्नती आवडणार नाही का?. तसंच आहे. पण आघाडी म्हणून आम्ही पाच वर्षासाठी श्री ठाकरे यांनाच स्विकारले आहे.

अजित पवार म्हणाले...
-
वारीचा अभिमान, पण कोरोनामुळे प्रतिबंध,
- लोकांच्या आरोग्यामुळे मंदीर, वारी याविषयी निर्बंध,
- मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेंना ५ वर्षासाठी निवडले,
- केंद्राच्या आर्थिक अडचणीमुळे स्मार्ट सिटी योजना रखडल्या.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख