पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन

राजेंद्र सरग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील होते.
Pune District Information Officer Rajendra Sarg dies due to corona
Pune District Information Officer Rajendra Sarg dies due to corona

पुणे : पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग (वय ५४ वर्षे) यांचे शनिवारी (ता. ३ एप्रिल) पहाटे उपचारादरम्यान ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राजेंद्र सरग यांच्यासाठी केलेले प्रयत्नही कमी पडले. सरग यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

सरग यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे समजताच जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी उपचारासाठी मोठे प्रयत्न केले होते. परंतु जिलाधिकाऱ्यांचे प्रयत्नही सरग यांना वाचवू शकले नाहीत. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. 

राजेंद्र सरग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील होते. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद येथील दैनिक तरुण भारतमधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. त्यानंतर राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची माहिती संचालनालयात नियुक्ती झाली होती. गेली चार वर्षांपासून ते पुण्यात जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्यरत होते. तत्पूर्वी राज्याच्या विविध भागात त्यांनी काम केले आहे. मनमिळावू स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने शासकीय यंत्रणेला आणि पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

पुणे जिल्ह्यात आजपासून सात दिवस रात्रीची संचारबंदी

पुणे : पुणे जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची संख्या चिंताजनकरित्या वाढते आहे. कोरोनाचा हा वाढता आलेख रोखण्यासाठी आजपासून (ता. ३) पासून सायंकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा दरम्यान पुढील सात दिवस अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा जमावबंदी लागू राहणार आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सर्व लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व पोलिस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत जवळपास सर्वच बैठकीत लोकप्रतिनिधींनी लाॅकडाऊन नको पण कडक निर्बंध लागू करा अशी भूमिका घेतली. सुमारे चार तास ही बैठक सुरु होती. बैठकीनंतर हाॅटेल, बार, माॅल, चित्रपटगृहे पुढील दोन आठवडे पूर्ण बंद राहणार आहेत.  येत्या ३० एप्रिलपर्यंत राज्यातील शाळा काॅलेजही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विना कारण गर्दी करणाऱ्यांवर आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com