कशाला बोलायला लावता ताई...बात निकली ही है, तो दूर तक जायेगी !  - MLA Ram Satpute gave an unequivocal answer to Adv Rohini Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

कशाला बोलायला लावता ताई...बात निकली ही है, तो दूर तक जायेगी ! 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

त्या उत्तरात  इशाराही दिला आहे.

पुणे : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या आमदार राम सातपुते यांना सडतोड उत्तर देणाऱ्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांना सातपुते यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. तसेच, त्या उत्तरात ‘कशाला बोलायला लावता ताई.....बात निकली ही है तो दूर तक जायेगी...!’ असा इशाराही दिला आहे. त्यालाही रोहिणी खडसे यांनीही उत्तर देत ‘भोसरी प्रकरणात खडसे दोषी होते, तर चौकशी समितीचा अहवाल विधीमंडळात का मांडला नाही,’ असे प्रतिआव्हान दिले आहे. 

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर रोहिणी खडसे आणि आमदार राम सातपुते यांच्यात ट्विट युद्ध रंगले आहे. 

‘नाथाभाऊ आपण आयुष्भर पैसे खायचे सोडून दुसरं काहीच केले नाही आणि देवेंद्रभाऊबदल बोलत आहात. विरोधी पक्षनेते असताना तोडपाणी आणि मंत्री झाले तेव्हा भ्रष्टाचार. निष्कलंक देवेन्द्रजीवर बोलण्याअगोदर आरसा बघा सगळं लक्षात येईल, अशा शब्दांत सातपुते यांनी खडसे यांना ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले होते.

त्याला खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनीही ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी म्हटले आहे की, खडसे जर पैसे खात होते, तर मग सत्ता होती, तेव्हा कारवाई का केली नाही? तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? आणि असेल तुमच्यात हिम्मत तर सिद्ध करा ना? श्यामराव फडणविशी मिरची तुम्हाला का झोंबली? ज्यांच्याबद्दल बोलले त्यांच्या तोंडात काय मिठाची गुळणी आहे का? अशा शब्दांत रोहिणी खडसे यांनी राम सातपुते यांचा समाचार घेतला होता.

त्यावर राम सातपुते आणि रोहिणी खडसे यांच्यात पुन्हा ट्विटच्या माध्यमातून सवाल-जवाब रंगला आहे. राम सातपुते यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, भोसरी जमीन घोटाळा... ताई मंत्रीपद गेलं ना हो नाथाभाऊंचं, या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळं. तीच कारवाई झाली ना तेव्हा. आणि यामुळेच आपला 2019 ला मुक्ताईनगरच्या जनतेने पराभव केला. कशाला बोलायला लावता ताई...?  बात निकली ही है तो दूर तक जायेगी ..! असा इशारा दिला होता. 

त्याला उत्तर देताना अ‍ॅड. रोहिणी खडसे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंत्रिपद काढले... जर भोसरी प्रकरणात दोषी होते, तर चौकशी समितीचा अहवाल विधिमंडळात का मांडला नाही? दूध का दूध पानी का पानी केले असते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख