अजित पवारांच्या शुभेच्छा फलकातून छगन भुजबळ गायब!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको परिसरात शुभेच्छा फलक लावण्यात आले. मात्र हे फलक शुभेच्छांएैवजी फलकावर पालकमंत्री छगन भुजबळ यांचे छायाचित्र टाळल्याने त्याची जास्त चर्चा झाली. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे चित्र निर्माण झाले.
AP -CB
AP -CB

सिडको :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको परिसरात शुभेच्छा फलक लावण्यात आले. (NCP leader Ajit Pawar Birthday Hoardings) मात्र हे फलक शुभेच्छांएैवजी फलकावर पालकमंत्री छगन भुजबळ यांचे छायाचित्र टाळल्याने त्याची जास्त चर्चा झाली. (Chhagan Bhujbal Photo absent on hoardings) यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे चित्र निर्माण झाले. (NCP Fraction came in front due to this) श्री. भुजबळ पालकमंत्री व पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांचे छायाचित्र आवश्यक होते, असे बोलले जाते.

हा फलक माजी आमदार डॅा. अपूर्व हिरे यांच्या समर्थकांनी लावला आहे. त्यामुळे यानिमित्ताने पुन्हा एकदा भुजबळ आणि हिरे यांच्यातील वाद अजूनही संपुष्टात आलेला नाही, असा संदेश देण्यात आला आहे. 

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. अपूर्व हिरे यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी केली होती. या वेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. डॉ. हिरे निवडून येतील, असे वातावरण त्या वेळीं होते. एवढेच नव्हे, तर डॉ. हिरे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असेही बोलले जात होते. डॉ. हिरे यांनी आधीपासूनच निवडणुकीची अतिशय काळजीपूर्व व नियोजनबद्ध तयारी केली होती. केवळ राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली असली तरी त्यांची लढाई ही वैयक्तिक म्हणजेच हिरे कुटुंबीयांचे प्रतिनिधी म्हणून होती. पक्षाकडून त्यांना फारशी रसद मिळाली नाही, अशी त्यांच्या समर्थकांत नाराजी होती. 

डॉ. हिरे हे स्वतःच्या क्षमतेवर उमेदवारी करीत होते. त्यामुळे पक्षापेक्षा व्यक्तिमत्त्वाची निवडणूक म्हणून त्याकडे पाहिले जात होते. परंतु त्यांचा थोडक्यात पराभव झाल्यानंतर या पराभवाची कारणमीमांसाही करण्यात आली. त्यातून बरेच निष्कर्ष बाहेर आले. स्वतःच्या पक्षातूनच पराभव झाल्याचेही बोलले गेले. त्यामुळे सुरवातीला जवळचे वाटणारे पालकमंत्री भुजबळ त्यांच्या समर्थकांच्या बॅनरवरून हळूहळू अदृष्य झाल्याचे दिसू लागले. त्याचे प्रत्यंतर गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्या वेळी श्री. हिरे यांच्या समर्थकांनी सिडको परिसरात शुभेच्छांचे फलक लावले होते. मात्र या फलकावर  पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा  फोटो नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे भुजबळ व हिरे यांच्यातील राजकीय `सख्य` कायम असल्याचे यानिमित्ताने दिसून आल्याची चर्चा आहे.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com