`बिएचआर` घोटाळा; रिक्षाचालकही भरायचा लाखोंच्या ई-निविदा

बीएचआरची मालमत्ता गिळंकृत करण्यासाठी सुनील झंवरने नियोजनबद्धरित्या कट कारस्थान रचले. बहुतांशी मालमत्ता विक्रीच्या ई-टेंडरिंगमध्ये त्याच्या संस्थेतील नोकर व शालेय पोषण आहाराच्या धान्य वाहतुकीसाठी वाहन पुरविणारे ठेकेदार इतकेच काय तर, त्याच्या रमेश मोटार ड्राईव्हींग स्कुलचा रिक्षा चालकाच्या नावाने ई-टेंडर भरल्याचे समोर आले आहे.
BHR F.
BHR F.

जळगाव : बीएचआरची (BHR credit Society) मालमत्ता गिळंकृत करण्यासाठी सुनील झंवरने (Sunil Zawar) नियोजनबद्धरित्या कट कारस्थान रचले. बहुतांशी मालमत्ता विक्रीच्या ई-टेंडरिंगमध्ये (E Tendering)  त्याच्या संस्थेतील नोकर व शालेय पोषण आहाराच्या धान्य वाहतुकीसाठी वाहन पुरविणारे ठेकेदार इतकेच काय तर, त्याच्या रमेश मोटार ड्राईव्हींग स्कुलचा (Ramesh motor driving school) रिक्षा चालकाच्या नावाने ई-टेंडर भरल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणेने अशा २२ लोकांच्या नावची यादीच न्यायालयात सादर केली आहे.

सुनील झंवर हा गुन्ह्यातील मुख्य संशयीत असून तो, यापूर्वीच अटक केलल्या सूरज झवर याचा पिता आहे. दोघांनी भागीदारीत विविध संस्थासंह कंपन्या उभ्या केल्या आहेत. त्याच कंपन्यांच्या नावाने संशयितांनी पूर्वनियोजित कट करून भाईचंद हिराचंद मल्टिस्टेट पतसंस्थेच्या मालमत्ता विक्रीच्या लिलावात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेतला . ही लिलाव प्रक्रिया ही केवळ कागदपत्री वेबसाईटद्वारे भासवीली आहे. प्रत्यक्षात ही प्रक्रिया सर्व टेंडर अटक आरोपी व त्यांच्या संबंधितांना मिळतील या दृष्टीने नियंत्रित केलेली होती.

भागिदारी अन्‌ निविदा प्रक्रिया
सुनील झंवर हा श्री साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनी व श्री सालासार ट्रेडिंग कंपनीमध्ये भागीदार आहे. या देान्ही कंपनीच्या बँक खात्यावरून निविदा धारकांचे बँक खात्यावर पैसे वर्ग करून त्यांच्यामार्फत तिचे स्वतःसाठी टेंडर भरले आहेत. या सर्व कंपन्या कागदोपत्री वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यातील आर्थिक व्यवहार एकत्रित असून या कंपन्यांच्या भागीदारी संस्थांच्या बँक खात्यावरून मोठ्या रकमा वारंवार एकमेकांकडे वर्ग झालेल्या आहेत. अगदी कवडीमोल भावात बीएचआरची मालकी असणाऱ्या संस्था, कंपन्या, जागा मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ‘डमी’ लोकांना पुढे करण्यात आले. कमी दरात मिळालेल्या या मालमत्ता घेतांना रोकड न देता या भामट्यांची चक्क ३० टक्क्यात ठेवीदारांकडून हिसकावलेल्या ठेवींच्या पावत्या जमा केल्या आहे.

झवरसाठी निविदा भरणारे
पूर्वनियोजित कटात सुनील झवरने साथीदारांशी संगनमत करून बहुतांशी ई- टेंडरिंगमध्ये आपल्या संस्था व त्यांचे शालेय पोषण आहाराचे कामासाठी वाहन पुरविणारे ठेकेदार, इतकेच नाही तर, रिक्षाचालकाच्या नावानेही मालमत्ता खरेदीचे टेंडर भरायला लावले.

असे आहेत ‘डमी’
यात आलोक शिवानी, हैदर पिंजारी, मनीष मराठे, सौरभ केदारी, रोहित कोठारी, निरंजन कोठारी, प्रशांत महामुनकर, राजेंद्र माळी, मेहेगाराम सैनी, कैलास धुत, अरुण सोनार, जितेंद्र बडगुजर, अनुपम कुलकर्णी, सुदेश भन्साळी, धीरज सोनी, जितेन्‍द्र तातेड, योगेश लढ्ढा, मयूर इंद्राणी, केतन मालू, नितिन भन्साळी, आकाश माहेश्वरी, छगन कोरडे याचा समावेश आहे.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com