डॉ  भालचंद्र कांगो यांना  क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार

महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार जेष्ठ कृतिशील मार्क्सवादी विचारवंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव, शेतकरी, कामगार चळवळीचे सक्रिय मार्गदर्शक डॉ भालचंद्र कांगो यांना जाहीर झाला आहे.
Bhalchandra Congo
Bhalchandra Congo

नाशिक : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा (Reputed Award in Maharashtra)  यंदाचा क्रांतीसिंह नाना पाटील पुरस्कार जेष्ठ कृतिशील (Krantisingh Nana Patil Award) मार्क्सवादी विचारवंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव, शेतकरी, कामगार चळवळीचे सक्रिय मार्गदर्शक  डॉ  भालचंद्र कांगो (Dr Bhalchandra Kango) यांना जाहीर  झाला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठ संस्थेचे अॅड सुभाष पाटील यांनी ही माहिती दिली. 

आता पर्यंत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आचार्य शांताराम गरूड, क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी, प्रा डॉ भाई एन. डी. पाटील, `शेकाप`चे जेष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, बेळगावचे कृष्णा मेणसे , मेधाताई पाटकर, डॉ विकास आमटे, डॉ अभय बंग, जेष्ठ पत्रकार पी साईनाथ, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव कॉम्रेड सिताराम येचुरी, पद्मश्री डॉ गणेश देवी यांना देण्यात आला आहे. 

डॉ कांगो यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र शाखेचे राज्य सचिव, आयटक कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष,   लोकवाड्मय गृहचे अध्यक्ष, साप्ताहिक युगांतरचे संपादक म्हणून तसेच 2011 मध्ये औरंगाबाद येथे अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. 

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहीत्य संमेलन, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन, मार्क्स गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन राज्य भर आयोजन करण्यात पुढाकार घेतला आहे. विद्यार्थी दशेपासून चळवळीत झोकून देऊन पूर्णवेळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काम करीत आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामांतर चळवळीत  सहभागी होते. शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे, भाकप राज्य सचिव असताना सहसचिव म्हणून ते 9 वर्ष कार्यरत होते.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून नंतर पक्षाची धुरा सांभाळत शेतकरी, कामगार, प्रागतिक साहित्यिक चळवळ मजबूत करण्यासाठी ते कार्यरत आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियावर सातत्याने श्रमिकांच्या बाजूने, धर्मनिरपेक्षता, संविधानिक भूमिका मांडत असतात. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या डॉ कांगो यांना क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध संघटना तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक, किसान सभा व  परिवर्तन वादी चळवळीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे, असे पत्रक राजू देसले यांनी काढले आहे. 
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com