मला आक्रमक व्हायला दोन मिनिटे लागतात.... : संभाजीराजेंचा इशारा

27 मे रोजी सविस्तर भूमिका मांडणार...
sambhajiraje
sambhajiraje

नाशिक : खासदार छत्रपती संभाजीराजे (MP Chatrapati Sambhajiraje) यांनी एकाच वेळी भाजप आणि महाविकास आघाडी सरकारला फटकारले आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर आरोप करून मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) जबाबदारी झटकत असल्याचा आरोप त्यांनी केला. या त्यांच्या आरोप-प्रत्यारोपांचे मराठा समाजाला घेणे-देणे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मला आक्रमक व्हायला दोन मिनिटे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. (BJP and State Govt not taking responsiblity of Maratha Reservation says Sambhajiraje)

नाशिक येथे पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतरची आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. भाजपने मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नये, असा इशारा देतानाच महाविकास आघाडी सरकारला मराठा तरुणांना आधीच्या आरक्षणानुसार दिलेल्या नोकऱ्या देण्यात काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी केला. तसेच या नोकऱ्या देता येत नसतील सारथी या संस्थेला छत्रपती शाहू महाराजांचे दिलेल नाव काढून टाका, अशा शब्दांत राज्य सरकारला सुनावले. जे हातात आहे, ते आधी करा, असाही सल्ला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. 

``मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे. अभ्यासू लोकांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे येत्या 27 मे रोजी  मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षांना भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी माझी भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. 102 व्या घटनादुरूस्तीवर मी त्याच दिवशी बोलणार आहे. मराठा समाजाने 27 मे पर्यंत शांत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. 

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 4 वेळा भेटीसाठी परवानगी मागितली. सर्वपक्षीय नेत्यांना विनंती की समाजाची दिशाभूल करू नका. जबाबदारी झटकू नका,समाजाला दिलासा द्या. आंदोलन कसं करायचं हे मला कोणी शिकवण्याची गरज नाही. 102 व्या घटनादुरुस्तीवर 27 मे रोजी बोलणार, असंही संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यांची भूमिका घ्यावी. मी काही त्यांचा ठेका घेतलेला नाही. गेल्या सरकारने बोगस कायदा केला का या सरकारने सर्वोच्च न्यायालयात नीटपणे भूमिका मांडली नाही, याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर केवळ ढकलाढकली करत आहेत. त्यामुळे आंदोलन काय असतं हे इतरांनी मला शिकवू नये. मराठा समाजाची दिशाभूल कराल तर हा संभाजी महाराज आडवा येईल, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

मी माझा महाल सोडून राज्य पिंजून काढत आहे. ही वेळ आक्रमक होण्याची नाही. प्लेगच्या साथीच्यावेळीही राजर्षी शाहू महाराजांनी असाच संयम दाखवला होता. आक्रमक व्हायला दोन मिनिटं लागतात. आंदोलनाला काय लागतं, आता लगेच करु. पण त्यामध्ये कोणी मयत झाले तर त्याला जबाबदार कोण, शाहुंचा वंशज, असा सवाल संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com