ते 27 नगरसेवक अपात्र ठरणार? भाजपची तीस हजार पानांची याचिका 

जळगाव महापालीकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी नुकतीच ऑनलाईन निवडणूक झाली.
BJP .jpg
BJP .jpg

जळगाव : जळगाव महापालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे तब्बल तीस हजार पानांची याचिका दाखल करण्यात आली आहे. लवकरच त्याची सुनावणी होणार आहे.

जळगाव महापालीकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी नुकतीच ऑनलाईन निवडणूक झाली. यात बहुमत असतानाही शिवसेनेने भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फोडून महापलिकवर आपला महापौर, उपमहापौर निवडून आणला. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकरणात खळबळ उडाली. भाजपला नामुष्की पत्करावी लागली. राज्यातील नगरसेवकांची ही मोठी फूट ठरली आहे. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी या फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता.

फुटलेल्या नगरसेवकांवर अपात्र ठरविण्यात कारवाई करावी यासाठी भाजपतर्फे आज नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका तब्बल तीस हजार पानांची असल्याचे सांगण्यात आले. जळगाव महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालानी, यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांच्या सोबत महापालिकेतील गटनेते जगदीश पाटील, तसेच पक्षाचे वकील अॅड. भगत, अॅड. मेढे पाटील उपस्थित होते.

या बाबत पक्षाचे महापालिकेतील गटनेते बालाणी यांनी सांगितले, पक्षाच्या फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे याबाबत ही याचिका आहे. तब्बल तीस हजार पानांची याचिका असून या सोबत संपूर्ण पुरावे जोडण्यात आले आहेत. यात नगरसेवकांना घरी जाऊन बजावला गेलेला व्हिप, जाहीर व्हिप, नगरसेवकांनी ऑनलाईन केलेले मतदान, असे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे या फुटीर नगरसेवकांवर निश्चित कारवाई होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भाजपने दाखल केलेली तीस हजार पानांची याचिका राज्यातील महापालिकेच्या इतिहासात पहिलीच याचिका आहे. त्यामुळे या याचिकेवर काय निकाल लागतो या कडे राज्याचे लक्ष असणार आहे.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com