उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार? एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा - Urban Development Minister Eknath Shinde meet  Advocate Ujjwal Nikam | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार? एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 जुलै 2021

निकम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

मुंबई : राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शनिवारी निकम (Advocate Ujjwal Nikam) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड बराचवेळ चर्चा झाली. (Urban Development Minister Eknath Shinde meet  Advocate Ujjwal Nikam) 

हेही वाचा : डॅा. भारती पवारांच्या राज्यमंत्रीपदामागे भाजपचा आहे 'हा' मनसुबा!

या चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, त्यामुळे निकम शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. गेल्या महिन्यात जळगाव दौऱ्यावर असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकनाथ शिंदे, उज्वल निकम यांना भेटल्याने शिवसेनेकडून प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. 

या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उज्ज्वल निकम यांना राजकारणात येण्याची ऑफर दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून  निकम यांना राज्यसभेवर पाठवण्याचा मानस होता. मात्र, उज्ज्वल निकम यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. उज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आरक्षण उठल्यास तिकडून निवडणूक लढवण्याचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो, अशी माहिती मिळत आहे.

हेही वाचा : आम्ही काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर नाही: काँग्रेस नेत्याची पवारांवर कडवट टीका 

एकनाथ शिंदे यांच्या बरोबर झालेल्या चर्चे विषयी उज्वल निकम यांना विचारले असता ते म्हणाले की ''मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केला नाही. शिंदे यांच्यासोबत माझी बंद दाराआड चर्चा झाली. त्याचा तपशील आत्ताच सांगता येणार नाही. यापूर्वी मी पवार यांचा प्रस्तावही नाकारला होता. संजय राऊत आणि माझी गेल्या महिन्यातील भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येतात, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख