शिवसेनेचा नेता जळगावात: नगरसेवक वकिलाच्या दारात - Shiv Sena corporator absent from Sanjay Raut meeting | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेचा नेता जळगावात: नगरसेवक वकिलाच्या दारात

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 13 जून 2021

जळगाव महापालिकेत भाजपचे तब्बल २७ नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्ता मिळवली.

जळगाव : भाजपचे नगरसेवक फोडून शिवसेनेने (Shiv Sena) महापालिकेत सत्ता मिळवली, परंतु यातील काही नगरसेवक शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बैठकीला गैरहजर राहिले, आपले पद वाचविण्यासाठी ते नाशिक व औरंगाबाद येथे वकिलांशी चर्चा करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता या नगरसेवकाचा शिवसेनेवर विस्वास नाही का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. (Shiv Sena corporator absent from Sanjay Raut meeting)

हे ही वाचा : मोदी सरकारच्या 7 वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के तर डिझेलवरील करात 600 टक्के वाढ

जळगाव महापालिकेत भाजपचे तब्बल २७ नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्ता मिळवली. सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे मोठे नेते संजय राऊत प्रथमच जळगाव दौऱ्यावर आले होते. त्या मुळे सत्तेतील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असे वाटत होते. मात्र, फुटलेल्या २७ नगरसेवक यांच्या पैकी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह मोजके सहा ते सात नगरसेवक संजय राऊत यांनी घेतलेल्या बैठकीस उपस्थित होते. त्यामुळे जळगावात चर्चा सुरू झाली आहे.

या बाबत सांगण्यात आले की, फुटलेल्या नगरसेवक याना अपात्र करावे यासाठी भाजपने नाशिक विभागीय आयुकतांकडे याचिका दाखल केली, त्याच्या नोटीस लवकरच निघणार आहेत. त्यामुळे नेत्यांपेक्षा आपले पद वाचविणे महत्वाचे असल्याने या नगरसेवकांनी नाशिक व औरंगाबाद येथे वकील तसेच महापालिका तज्ज्ञ यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले.

हे ही वाचा : खेड पंचायत समितीच्या ६ सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार; पक्षविरोधी भूनिका महागात

मात्र, सेनेचे मोठे नेते जळगावात आले असताना नेमके त्याच दिवशी फुटलेले नगरसेवक भेटीसाठी बाहेरगावी का गेले? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवसेना या नगरसेवकांना अपत्रतेपासून वाचवू शकत नसल्याची भीती वाटत आहे का अशी चर्चाही सुरू झाली आहे. मात्र नगरसेवकांच्या अनुपस्थतीमुळे शिवसेनेचे पुढचे पाऊल काय असणार याकडेच आता लक्ष आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख