भाजपमध्ये राहणार की राष्ट्रवादीत जाणार; रक्षा खडसे म्हणाल्या... 

देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात गेले होते. त्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी हजेरी लावली.
 Raksha Khadse, Devendra Fadnavis, Eknath Khadse .jpg
Raksha Khadse, Devendra Fadnavis, Eknath Khadse .jpg

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल जळगावातील मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर होते. माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप (BJP) सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस हे प्रथमच खडसेंच्या मतदारसंघात गेले होते. त्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरी हजेरी लावली. मात्र, यावेळी एकनाथ खडसे घरी नव्हते. खडसे दोन दिवसापूर्वीच मुंबईला गेले आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी भाजप खासदार रक्षा खडसे यांची भेट घेतली. त्यांनी खडसेंच्या घरी चहा-नाष्टाही घेतला. (Raksha Khadse reacted to Devendra Fadnavis' visit)

या भेटीसंबंधी बोलताना खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले की, ''देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच घरी आले असे नाही, याआधीही ते अनेकदा आमच्या घरी येऊन गेले आहेत. राजकारण राजकारणाच्या जागी असून आमचे संबंध चांगले असल्याचे ही त्या म्हणाल्या. एकनाथ खडसे यांचेही त्यांच्याशी बोलणे झाले, असा खुलासा रक्षा खडसे यांनी केला. भाजपाची खासदार असताना नेते आल्यानंतर त्यांना घरी बोलावणे आणि चहा पाण्यासाठी विचारणे माझं कर्तव्यच आहे'', असेही त्या म्हणाल्या.

आम्ही सर्व आमदार, पदाधिकारी, यांनी शेतात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या शंका फडणवीसांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मागील आठ दिवसांत पाऊस, वारा यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. केळीच्या बागा झोपल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हातातील माल गेला आहे. पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न ते नक्कीच विधानसभा आणि मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील,” असेही रक्षा खडसे यांनी सांगितले. 

रक्षा खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? असे विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की,  ''अशा चर्चा होत असतात, पण जोपर्यंत मी काही अधिकृत सांगत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही'' पक्षाने जबाबदारी दिली तर पुढील लोकसभा निवडणूकही भाजपाकडूनच लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर जळगाव जिल्ह्यात पक्षाची मोठ्या प्रमाणात पडझड होत आहे. गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर पंचायतीमधील भाजपच्या दहा नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. जळगाव महापालिकेतीन भारतीय जनता पक्षाच्या २९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळे भाजपला जळगाव महापालिकेती एकहाती सत्ता सोडावी लागली. हे सर्व नगरसेवक हे एकनाथ खडसे यांचे समर्थक आहेत असे सांगितले जात आहे.  

राज्यात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ज्येष्ठ नेते म्हणून मुख्यमंत्री पदावर खडसे यांची वर्णी लागेल असी चर्चा होती. मात्र, त्यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना मुख्यमंत्री केले तेव्हापासून फडणवीस आणि खडसे यांचे संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर खडसे यांना मंत्री मंडळातूनही राजीनामा द्यावा लागला होता. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांना तिकीट न देता त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांना तिकीट दिले मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे नाराज झालेल्या खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर फडणवीसांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com