प्रदेश काँग्रेस उपाध्यपदी डॉ. उल्हास पाटील तर जळगाव शहर अध्यक्षपदी श्याम तायडे 
Ulhas Patil .jpg

प्रदेश काँग्रेस उपाध्यपदी डॉ. उल्हास पाटील तर जळगाव शहर अध्यक्षपदी श्याम तायडे 

पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रदेश कार्यकारिणीची राज्यातील नेतेमंडळींपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना प्रतीक्षा होती.

जळगाव : नाना पटोले (Nana Patole) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पाच महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गुरुवारी अखेर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जंबो कार्यकरिणी घोषित केली. यामध्ये १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, 104 सेक्रेटरी आणि सहा प्रवक्तांचा समावेश आहे. त्यामध्ये जळगाव मधून माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Ulhas Patil appointed as Vice President of Pradesh Congress) 

पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रदेश कार्यकारिणीची राज्यातील नेतेमंडळींपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना प्रतीक्षा होती. तब्बल पाच महिन्यांनंतर पटोले यांची नवी कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यात कार्यकारिणीत उपाध्यक्ष, खजिनदार, जनरल सेक्रेटरी, सेक्रेटरी, प्रवक्ते, विशेष निमंत्रित सदस्य यांचा समोवश असलेली २२० जणांची ही कार्यकारिणी आहे. यामध्ये दोन ट्रासजेंडर व्यक्तींचाही समावेश आहे. कार्यकारिणीत ४८ विविध समाजाला स्थान देण्यात आलेले आहे.   

त्याच बरोबर अनेक शहर अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातच जळगाव शहर अध्यक्षपदी श्याम तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद गेल्या. दोन वर्षांपासून रिक्त होते. या पदावर अनेक जणांचा दावा सांगण्यात येत होता. मात्र, पक्षाचे कार्यकर्ते श्याम तायडे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने ही यादी जाहीर करण्यात आली आहे.   

दरम्यान, नवीन कार्यकारिणीचे सरासरी वय 52 असून सत्तर वय असलेल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. माजी आमदार माणिक जगताप यांची मुलगी स्नेहल जगताप या कार्यकारिणीत सर्वांत तरुण असून त्या 30 वर्षांच्या आहेत. माणिक जगताप यांचे निधन झाले, त्यांची मुलगी स्नेहल यांना संधी देण्यात आली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.  

Related Stories

No stories found.