नाशिकला १४० पोलिस झाले कोरोनामुक्त

नाशिक शहरातही रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने शहराच्या काही भागात होम टू होम तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे निर्धास्त वाटणाऱ्या नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र यामध्ये दिलासादायक म्हणजे, १४०पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत.
Hundred and Forty Policemen From Nashik Turned Corona Negative
Hundred and Forty Policemen From Nashik Turned Corona Negative

नाशिक : नाशिक शहरात कोरोनाने शहरात आजवर कोरोनाबाधित आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा ५८ झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १००२ झाली आहे. सध्या नाशिक शहरातही रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने शहराच्या काही भागात होम टू होम तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे निर्धास्त वाटणाऱ्या नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र यामध्ये दिलासादायक म्हणजे १४० पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत. 

मालेगाव बंदोबस्तामध्ये नाशिक ग्रामीणचे ८५, जालना एसआरपीएफचे ३९, औरंगाबाद एसआरपीएफचे १०, अमरावती एसआरपीएफचे १३, मरोळ, धुळे पीटीएस व धुळे एसआरपीएफचे प्रत्येकी एकेक, मुंबई रेल्वेचे तीन, तर जळगाव मुख्यालयाचे चार अशा १५७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत यातील १४० पोलिस कोरोनामुक्त झाले असून, १४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर, यातील नाशिक ग्रामीणमधील तीन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. 

नाशिक शहरातील पखला रोड भागातील ७३ वर्षीय कोरोना बाधीत रुग्णाचा जिल्हा रुग्णालयातउपचार सुरु असतांना मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या आठ झाली आहे. शहरातील कॉलेज रोड येथील रहिवासी व नाशिक ग्रामीण पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या ५१ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा  कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मालेगाव येथे बंदोबस्तानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह होता. गेल्या २१ मेस त्रास होऊ लागल्याने ते डॉ. झाकिर हुसेन हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आले असताना स्वॅब घेण्यात आले होते.

आडगाव येथील मविप्रच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी त्यांचा कोरोनाविरोधातील लढा अपयशी ठरला. त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य पॉझिटिव्ह असून, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. सोमवारीच आणखी एका हवालदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यामुळे नाशिक ग्रामीण पोलिस दलातील आतापर्यंत तीन पोलिस कोरोना विषाणूचे बळी ठरले आहेत. 

शहरात बाधित रुग्ण वाढले 

नाशिक शहरात मंगळवारी रात्रीपर्यंत आणखी १२ रुग्ण वाढले आहेत. यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील हे रुग्ण आहेत. सिन्नरमध्ये तीन आणि परजिल्ह्यातील अकोल्याचा एक व कुर्ल्याचा एक अशी एकूण १७ नवीन रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सध्या जिल्ह्यात १००२ कोरोनाबाधित रुग्ण असले, तरी त्यांपैकी ७३५ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील कोविड सेंटर्समध्ये १९४ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रलंबित स्वॅबचे प्रमाण पुन्हा वाढीस लागले आहे. मंगळवारी ५१२ संशयित रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित असून, आतापर्यंत आठ हजार ८४९ रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com